Earthquake In Tango Dainik Gomantak
ग्लोबल

Earthquake of Tonga: टोंगामध्ये जाणावले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 7.6 एवढी तीव्रता

दक्षिण पॅसिफिक महासागरात असलेल्या टोंगा येथे बुधवारी (10 मे) भूकंपाचे धक्के जाणवले.

दैनिक गोमन्तक

Earthquake of Magnitude 7.6 Jolted Tonga: दक्षिण पॅसिफिक महासागरात असलेल्या टोंगा येथे बुधवारी (10 मे) भूकंपाचे धक्के जाणवले.

युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हेने केलेल्या ट्विटनुसार , टोंगाच्या हिहिफोच्या वायव्येस 95 किलोमीटर अंतरावर 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू पृथ्वीपासून 210.0 किमी खोलीवर होता. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. त्याच वेळी, अमेरिकन त्सुनामी चेतावणी प्रणालीने या शक्तिशाली भूकंपाबद्दल सांगितले की यावेळी सुनामीचा धोका नाही. सध्या कोणताही इशारा जारी केलेला नाही

  • तुर्की-सीरियामध्ये विनाशकारी भूकंप झाला

फेब्रुवारी महिन्यात तुर्कित येथे विनाशकारी भूकंप झाला होता. येथील भूकंपाची तीव्रता 7.8 रिश्टर स्केल एवढी होती आणि त्याचे केंद्र दक्षिण तुर्कस्तानमधील गझियानटेप हे होते. 

त्याचप्रमाणे सीरियातही त्याचा मोठा परिणाम दिसून आला. या भूकंपाने एवढी विध्वंस घडवून आणली होती की, मृत्यूच्या आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर या काळात सुमारे 46 हजार लोकांचा मृत्यू झाला होता. 

  • तुर्कि-सीरियातही जाणावले होते भुकंपाचे धक्के

एका अहवालानुसार, तुर्कीमध्ये झालेल्या या भूकंपामुळे 2 लाख 62 हजार घरांच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या असून अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. एकापाठोपाठ एक अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

वास्तविक, 6 फेब्रुवारी रोजी दुपारी 4.17 वाजता तुर्कीमध्ये भूकंपाचा पहिला धक्का बसला. त्याची तीव्रता 7.8 होती. काही वेळाने पुन्हा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. यावेळी तीव्रता 6.4 तीव्रता होती. त्याचवेळी तिसऱ्यांदा आलेल्या भूकंपाची तीव्रता 6.5 इतकी होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amit Shah Goa Visit: अमित शहांचे 'मिशन गोवा'! विधानसभा निवडणुकीच्या अंतिम रणनीतीसाठी भाजपची 'मेगा' बैठक

Assembly Election: जनगणना डिसेंबरमध्ये, फेब्रुवारीत निवडणूक! केंद्राच्या आदेशाने गोवा विधानसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा

IND vs PAK: टीम इंडियाकडून लाजीरवाणा पराभव होऊनही मस्ती उतरेना! पाकिस्तानचा कोच म्हणतोय, 'आम्हीच बेस्ट'; आशिया कप जिंकण्याचा दावा Watch Video

Horoscope: रविवारचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट! नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना मिळणार मोठी गुड न्यूज, पण 'या' राशींनी राहावे अत्यंत सावध

Jungle Life and Biodiversity: निसर्गाची 'जंगल' ही कादंबरी; पशू-पक्ष्यांपासून वृक्षवेलींपर्यंत उलगडते निसर्गाची अद्भुत जीवनकथा

SCROLL FOR NEXT