Donald Trump Iran Threat DainikGomantak
ग्लोबल

Donald Trump Iran Threat: 'लवकर निर्णय घ्या, अन्यथा काहीच उरणार नाही', ट्रम्प यांचा इराणला पुन्हा थेट आणि कडक इशारा; क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये मोठी उसळी

Trump National Security Meeting: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा पथकातील सर्वोच्च अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली.

Manish Jadhav

Donald Trump Iran Threat: इराण आणि अमेरिका यांच्यातील वाढता तणाव दिवसेंदिवस अधिकच चिघळत चालला आहे, ज्याचा थेट आणि मोठा फटका जागतिक बाजारपेठेला बसत असून कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये प्रचंड उसळी पाहायला मिळत आहे. या गंभीर पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शनिवारी आपल्या राष्ट्रीय सुरक्षा पथकातील सर्वोच्च अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक घेतली. सीएनएनने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, या बैठकीचा मुख्य हेतू इराणसोबतच्या संभाव्य युद्धाबाबत पुढील रणनीती आणि आखणी यावर सखोल चर्चा करणे हा होता.

दुसऱ्या बाजूला या वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर प्रति बॅरल 110 डॉलरच्या पार गेले आहेत. किमती वाढण्यासोबतच ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा जाहीर धमकी दिली. ट्रम्प यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे इराणला (Iran) इशारा दिला की, इराणकडे आता फारसा वेळ उरलेला नाही. त्यांनी वेगाने हालचाली करुन योग्य तो निर्णय घ्यावा, अन्यथा त्यांच्याकडे शेवटी काहीच उरणार नाही, कारण वेळ अत्यंत मौल्यवान आहे.

सध्या ब्रेंट क्रूड फ्युचर्सचे दर 1.32 टक्क्यांनी वाढून 110.70 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले आहेत, जी गेल्या काही महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. तसेच, अमेरिकन वेस्ट टेक्सास इंटरमीडिएटचे दरही 1.75 टक्क्यांनी वाढून 107.26 डॉलर प्रति बॅरलवर गेले आहेत.

फेब्रुवारीच्या अखेरीस जेव्हा अमेरिका (America) आणि इस्रायलने इराणवर पहिला हल्ला केला, तेव्हापासून आतापर्यंत तेलाच्या किमती 50 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'होर्मुझ स्ट्रेट'मधून तेलाची वाहतूक कमी झाल्यामुळे पर्शियन आखातातील उत्पादक देशांकडून होणारा पुरवठा कमालीचा घटला आहे.

मॉर्गन स्टेनली या जागतिक वित्तीय संस्थेच्या मते, जर हा अत्यंत महत्त्वाचा जलमार्ग जून महिन्यापर्यंत पूर्णपणे बंद राहिला, तर जागतिक बाजारावर आणि तेलाच्या किमतींवर प्रचंड दबाव निर्माण होईल. त्यातच ट्रम्प प्रशासनाने रशियाकडून कच्च्या तेलाच्या विक्रीसाठी दिलेली सवलत संपवल्यामुळे पुरवठ्याची साखळी आणखी कोलमडली; विशेष म्हणजे भारताने ही सवलत वाढवण्याची विनंती करुनही अमेरिकेने ती फेटाळली आहे.

तणाव वाढण्याचे आणखी एक कारण म्हणजे वीकेंडला पर्शियन आखातातील ऊर्जा प्रकल्पांना लक्ष्य करण्यात आले. एका ड्रोन हल्ल्यात संयुक्त अरब अमिरातीच्या अणुऊर्जा प्रकल्पाला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली. सध्या या सर्व घडामोडींवर व्हाईट हाऊसमध्ये खलबते सुरु आहेत. ट्रम्प यांनी उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हॅन्स, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ आणि सीआयएचे संचालक जॉन रॅटक्लिफ यांच्यासह प्रमुख नेत्यांशी चर्चा केली असून मंगळवारी पुन्हा राष्ट्रीय सुरक्षा पथकाची बैठक होणार आहे.

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, त्यांना इराणसोबत करार करायचा आहे आणि ते इराणच्या सुधारित प्रस्तावाची वाट पाहत आहेत. मात्र, इराणने अमेरिकेच्या अपेक्षेप्रमाणे पावले उचलली नाहीत, तर त्याचे गंभीर परिणाम इराणला भोगावे लागतील, असा कडक इशाराही ट्रम्प यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT