Donald Trump Threatened To Impose Higher Import Duties On India If He Comes Back To Power Next Year. Dainik Gomantak
ग्लोबल

Donald Trump: 'सत्तेवर आलो तर आम्हीही...', डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला धमकी

Ashutosh Masgaunde

Donald Trump Threatened To Impose Higher Import Duties On India If He Comes Back To Power Next Year:

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही अमेरिकन उत्पादनांवर भारताकडून जास्त आयात शुल्क आकारले जात असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा उपस्थित केला आहे. पुढच्या वर्षी पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर अधिकचे आयात शुल्क लावण्याची धमकी त्यांनी दिली आहे.

विशेष म्हणजे, अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांनी भारताचे वर्णन टॅरिफ किंग म्हणून केले होते. ट्रम्प यांनी मे 2019 मध्ये, भारताने अमेरिकेला भारताच्या बाजारपेठांमध्ये प्रवेश न दिल्याचे कारण देत भारताची सामान्यीकृत प्रणाली (GSP) संपुष्टात आणली होती.

भारत खूप कर लादतो

ट्रम्प यांनी एका मुलाखतीत सांगितले की त्यांनी भारतीय आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे, तर भारत मात्र खूप जास्त आयात शुल्क लादतो.

ते म्हणाले की, मला एकसमान आयात शुल्क हवे आहे. आयात शुल्क आकारणीच्या बाबतीत भारत खूप पुढे आहे. हार्ले डेव्हिडसन मोटारसायकलवरील कर पाहता हे स्पष्टपणे दिसून येते. ते पुढे म्हणाले की मला फक्त विचारायचे आहे की भारतासारख्या ठिकाणी हे कसे होऊ शकते?

हार्ले डेव्हिडसनचा मुद्दा

मी सांगितल्याप्रमाणे त्यांना भारतीय मोटरसायकल इथे विकता येईल. ते भारतीय बाईक बनवतात, जी आमच्या देशात कोणत्याही कराशिवाय विकली जाऊ शकते, परंतु जेव्हा तुम्ही हार्ले डेव्हिडसन बनवता आणि तुम्ही ती तिथे पाठवता तेव्हा त्यांच्यावर जास्त कर आकारला जातो. त्यामुळे याला व्यवसाय म्हणता येणार नाही.

2018 मध्ये ट्रम्प यांच्या टीकेनंतर, भारताने हाय-एंड इम्पोर्टेड बाइक्सवरील कस्टम ड्युटी 75% वरून 50% पर्यंत कमी केली होती.

ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, "जर भारताने आमच्याविरुद्ध आयात शुक्ल वाढवले, तर आम्हीही तसेच करू. माझा दृष्टीकोन परस्परपूरक आहे. याला तुम्ही बदला म्हटले तरी हरकत नाही. जर त्यांनी आमच्यावर जादा शुल्क लादले तर आम्ही प्रतिउत्तर देऊ."

गेल्या काही दिवसांपासून अनेक खटल्यांमध्ये अडकलेले अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT