Donald Trump @DonaldTrump
ग्लोबल

Donald Trump: अमेरिकेत नवा वाद! जॉर्ज वॉशिंग्टन, अब्राहम लिंकन यांच्या पंक्तीत आता डोनाल्ड ट्रम्प; 'त्या' फोटोनं जगाला चक्रावलं

Donald Trump Truth Social Digital Image: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राजकीय वारशाचा आणि महत्त्वाकांक्षेचा एक डिजिटल पुरावा सादर केला.

Manish Jadhav

Donald Trump Mount Rushmore Photo: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या राजकीय वारशाचा आणि महत्त्वाकांक्षेचा एक डिजिटल पुरावा सादर केला, ज्यावरुन सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटले. ट्रम्प यांनी त्यांच्या अधिकृत 'ट्रुथ सोशल' या प्लॅटफॉर्मवरुन एक डिजिटल पद्धतीने तयार केलेला फोटो शेअर केला. या फोटोमध्ये अमेरिकेच्या इतिहासातील अत्यंत प्रतिष्ठित आणि ऐतिहासिक मानल्या गेलेल्या 'माऊंट रशमोर' या स्मारकावर इतर महान राष्ट्राध्यक्षांच्या पाषाणमूर्ती शेजारी स्वतःचा चेहरा कोरलेला दाखवला.

विशेष म्हणजे हा फोटो पोस्ट करताना ट्रम्प यांनी खाली कोणतेही कॅप्शन, मजकूर किंवा भाष्य केलेले नाही; तरीही त्यांच्या या मूक विधानाने संपूर्ण अमेरिकेत (America) आणि जागतिक पातळीवर राजकीय चर्चांना उधाण आले.

दक्षिण डकोटा येथील कीस्टोनमधील ब्लॅक हिल्सच्या ग्रॅनाइट पर्वतावर 'माऊंट रशमोर नॅशनल मेमोरियल' हे भव्य स्मारक आहे. या डोंगरावर अमेरिकेचे चार माजी राष्ट्राध्यक्ष- जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, थिओडोर रुझवेल्ट आणि अब्राहम लिंकन यांचे 60 फूट उंच चेहरे कोरलेले आहेत. हे चार नेते अमेरिकेची स्थापना, प्रादेशिक विस्तार, आर्थिक प्रगती आणि देशाची अखंडता यांचे प्रतीक मानले जातात. मूळ शिल्पकार गत्झॉन बोर्गलम यांनी अमेरिकेच्या पहिल्या 150 वर्षांचा इतिहास दर्शवण्यासाठी या चार नेत्यांची निवड केली होती.

यामध्ये जॉर्ज वॉशिंग्टन प्रजासत्ताकाची स्थापना, थॉमस जेफरसन प्रादेशिक विस्तार, थिओडोर रुझवेल्ट देशाची आर्थिक प्रगती आणि जागतिक स्तरावरील उत्थान, तर अब्राहम लिंकन यादवी युद्धाच्या काळात अमेरिकेचे अस्तित्व टिकवून ठेवण्याचे प्रतीक आहेत. आता याच महान नेत्यांच्या पंक्तीत ट्रम्प यांनी स्वतःला दाखवले.

ट्रम्प यांना या राष्ट्रीय स्मारकावर स्थान मिळण्याची चर्चा नवीन नाही, तर या कल्पनेचा इतिहास 2018 मधील एका घटनेशी जोडलेला आहे. त्यावेळी ट्रम्प यांनी दक्षिण डकोटाच्या गव्हर्नर क्रिस्टी नोएम यांच्याकडे या डोंगरावर स्वतःचा चेहरा कायमचा कोरलेला पाहणे हे आपले 'स्वप्न' असल्याचे बोलून दाखवले होते. त्यानंतरच्या वर्षांत त्यांनी या कल्पनेचे वारंवार समर्थन केले असून आपल्या कार्यकाळातील ऐतिहासिक कामगिरीमुळे आपण या स्मारकावर स्थान मिळवण्यास पूर्णपणे पात्र असल्याचा दावा त्यांनी केला.

यापूर्वी 2020 मधील एका जाहीर सभेतही त्यांनी हा प्रस्ताव मांडला होता. सध्या ट्रम्प यांच्या या स्वप्नाला राजकीय पातळीवरही पाठबळ मिळत आहे. फ्लोरिडाच्या प्रतिनिधी अण्णा पाऊलिना लुना यांच्यासह काँग्रेसमधील त्यांच्या अनेक कट्टर समर्थकांनी देशाच्या गृह विभागाला माऊंट रशमोरवर ट्रम्प यांचा चेहरा कोरण्याचे आदेश देणारे औपचारिक कायदेशीर प्रस्ताव देखील सादर केले आहेत.

या मोहिमेला अधिक बळ देताना, गृह सचिव डग बर्गम यांच्यासह अनेक उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांनी या कल्पनेचे उघडपणे समर्थन केले. या ऐतिहासिक ठिकाणी आणखी एका नेत्याचा चेहरा कोरण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे संकेत या अधिकाऱ्यांनी दिले. ट्रम्प यांच्या या नव्या सोशल मीडिया पोस्टमुळे अमेरिकेच्या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि विद्यमान राजकारण यावरुन पुन्हा एकदा नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT