Donald trump And Mojtaba Khamenei  Dainik Gomantak
ग्लोबल

US Iran War: ''दादागिरी खपवून घेणार नाही, सर्वनाश करु'', ट्रम्प यांच्या धमकीवर मोजतबा खामेनेईंचा पलटवार; आखाती देशांत युद्धाचं सावट कायम

Mojtaba Khamenei Warning to USA: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्यातील शाब्दिक युद्ध आता टोकाला पोहोचले.

Manish Jadhav

Mojtaba Khamenei Warning to USA: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इराणचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनेई यांच्यातील शाब्दिक युद्ध आता टोकाला पोहोचले असून यामुळे जागतिक राजकारणात खळबळ माजली. इराणने अण्वस्त्र करारावर स्वाक्षरी न केल्यास त्यांना 'सर्वनाशा'ला सामोरे जावे लागेल, अशी थेट धमकी ट्रम्प यांनी दिली.

ट्रम्प यांच्या या धमकीला प्रत्युत्तर देताना मोजतबा खामेनेई यांनी अमेरिकेलाच इशारा दिला की, त्यांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. "ते आमचा काय सर्वनाश करणार? आम्हीच त्यांचा सर्वनाश करु आणि त्यांच्या युद्धनौकाही समुद्रात बुडवू," अशा जळजळीत शब्दांत इराणने अमेरिकेला आव्हान दिले. विशेषतः होर्मुज सामुद्रधुनीची नाकेबंदी मागे न घेतल्यास अमेरिकेला त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही खामेनेई यांनी स्पष्ट केले.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या धमकीत म्हटले होते की, इराणने माझ्याकडून दयेची अपेक्षा ठेवू नये, मी त्यांचा सर्वनाश करेन. ट्रम्प यांच्या या विधानाकडे केवळ एक राजकीय विधान म्हणून न पाहता, ती एका मोठ्या विनाशाची चाहूल मानली जात आहे. युद्धबंदीच्या चर्चेदरम्यान ट्रम्प यांच्या अशा प्रक्षोभक विधानामुळे आखाती देशांमध्ये पुन्हा एकदा तणावाची ठिणगी पडली.

जर इराणने (Iran) लष्करी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकन सैन्यही मागे हटणार नाही, असे संकेतही ट्रम्प यांनी दिले. मात्र, मोजतबा खामेनेई यांनी एका पत्राद्वारे अमेरिकेला खडसावून सांगितले की, अमेरिकेची जागा समुद्राच्या खोल गर्तेत आहे आणि पर्शियन गल्फमध्ये त्यांची मनमानी चालणार नाही. इराण कोणत्याही परिस्थितीत आपला अण्वस्त्र कार्यक्रम थांबवणार नाही आणि आपल्या क्षेपणास्त्र क्षमतेचे संरक्षण करेल, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

दरम्यान, 28 फेब्रुवारी 2026 रोजी इराणसोबत सुरु झालेले युद्ध आता अधिकृतपणे संपले असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केली. अमेरिकेच्या 'वॉर पॉवर रिझोल्यूशन' कायद्यांतर्गत, संसदेच्या 60 दिवसांच्या अनिवार्य मंजुरीची मुदत संपण्यापूर्वीच ही घोषणा करण्यात आली. मात्र, या आदेशात नौदलाच्या नाकेबंदीचा स्पष्ट उल्लेख नाही. जर इराणने अमेरिकेच्या कोणत्याही नौदल जहाजावर हल्ला केला, तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे 'चीफ-ऑफ-कमांडर' म्हणून संसदेच्या पूर्वपरवानगीशिवाय तात्काळ लष्करी कारवाईचे आदेश देऊ शकतात.

दुसरीकडे, इराणने होर्मुज सामुद्रधुनीवरील आपले नियंत्रण कायम असल्याचे सांगत, ट्रम्प यांना इराणचे संवर्धित युरेनियम मिळू देणार नाही, असा इशारा दिला. मध्यपूर्वेतून अमेरिका बाहेर पडल्यास तिथे शांतता प्रस्थापित होईल, असेही इराणचे मत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT