USS Gerald R. Ford Missile Attack Dainik Gomantak
ग्लोबल

Iran US War: यूएसएस जेराल्ड आर. फोर्डवर इराणचा भीषण हल्ला! ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 'जीव वाचवण्यासाठी अमेरिकन सैन्यानं काढला पळ'

USS Gerald R. Ford Missile Attack: मध्य पूर्वेतील युद्ध आता एका अत्यंत नाट्यमय आणि तितक्याच भीषण वळणावर येऊन पोहोचले.

Manish Jadhav

USS Gerald R. Ford Missile Attack: मध्य पूर्वेतील युद्ध आता एका अत्यंत नाट्यमय आणि तितक्याच भीषण वळणावर येऊन पोहोचले. जगातील सर्वात शक्तिशाली आणि अभेद्य मानले जाणारे अमेरिकेचे अण्वस्त्रसज्ज विमानवाहू युद्धपोत 'यूएसएस जेराल्ड आर. फोर्ड' यावर इराणने 17 वेगवेगळ्या कोनातून बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मारा केल्याचा खळबळजनक दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला.

इराणसोबत (Iran) सुरु असलेल्या संघर्षादरम्यान ट्रम्प यांनी एका जाहीर विधानात म्हटले की, इराणच्या या हल्ल्यामुळे अमेरिकन सैनिकांना आपला जीव वाचवण्यासाठी पळ काढावा लागला आणि जर वेळीच पावले उचलली नसती, तर सर्व काही संपले असते. ट्रम्प यांच्या या दाव्यामुळे अमेरिकन नौदलाच्या सुरक्षेवर आणि इराणच्या वाढत्या लष्करी ताकदीवर जागतिक स्तरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या मते, इराणच्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन्सनी या 13 अब्ज डॉलरच्या महाकाय युद्धपोताला चारही बाजूंनी घेरले होते, ज्यामुळे जहाजावर प्रचंड अफरा-तफरी माजली होती. ट्रम्प यांनी या घटनेला अमेरिकन नौदलासाठी एक मोठा धक्का म्हटले असून इराणच्या लष्करी क्षमतेने जगातील सर्वात आधुनिक संरक्षण यंत्रणेलाही आव्हान दिल्याचे मान्य केले. मात्र, दुसरीकडे पेंटागन या घटनेबाबत पूर्णपणे वेगळी माहिती देत आहे.

पेंटागनच्या अधिकृत निवेदनानुसार, यूएसएस जेराल्ड फोर्डवर कोणताही परकीय हल्ला झालेला नाही. जहाजाच्या मुख्य लॉन्ड्री एरियामध्ये शॉर्ट सर्किटमुळे किंवा तांत्रिक बिघाडामुळे आग लागली होती. ही आग तब्बल 30 तास धगधगत होती, ज्यामुळे 600 हून अधिक खलाशांना आपली झोपण्याची जागा सोडून जमिनीवर किंवा टेबलवर झोपावे लागले. या आगीत दोन खलाशी किरकोळ जखमी झाले असून अनेकांना धुरामुळे श्वसनाचा त्रास झाला.

पेंटागनने जरी हा हल्ला नसल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्षात हे युद्धपोत आता रेड सी मधील 'ऑपरेशन एपिक फ्युरी' मधून माघार घेऊन दुरुस्तीसाठी ग्रीसच्या 'सौदा बे' नौसैनिक तळावर पाठवण्यात आले. इराणविरुद्धच्या मोहिमेतील हे मुख्य व्यासपीठ युद्धक्षेत्रातून अचानक हटवण्यात आल्यामुळे अमेरिकन रणनीतीला मोठा तडा गेला. संरक्षण तज्ञांच्या मते, दीर्घकाळापासून सुरु असलेली तैनात, कर्मचाऱ्यांचा थकवा आणि देखभालीच्या समस्यांमुळे युद्धपोताच्या कार्यक्षमतेवर परिणाम झाला असावा. ट्रम्प प्रशासन जरी याला 'साधी समस्या' म्हणत असले, तरी विरोधी पक्षांनी आणि काही सिनेटर्सनी नौदलाच्या सज्जतेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

एक महिन्यापासून सुरु असलेल्या या युद्धात अमेरिकन लष्करी संसाधनांवर प्रचंड दबाव येत असल्याचे या घटनेने स्पष्ट केले आहे. जर ट्रम्प यांचा दावा खरा असेल, तर इराणने जगातील सर्वात प्रगत युद्धनौकेवर यशस्वी हल्ला करुन अमेरिकेच्या दहशतीला मोठा तडा दिला. तर दुसरीकडे, जर पेंटागनचा तांत्रिक बिघाडाचा दावा खरा असेल, तर इतक्या महागड्या युद्धपोतात लागलेली आग आणि 30 तास ती न विझणे हे अमेरिकन तंत्रज्ञानाचे अपयश मानले जात आहे. या युद्धपोताच्या दुरुस्तीसाठी लागणारा वेळ आणि मध्य पूर्वेतील बदललेली समीकरणे यामुळे आगामी काळात इराण-अमेरिका (America) संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Coffee Health Research: रोज कॉफी पिल्यास आयुष्य खरंच वाढतं? नव्या संशोधनातून समोर आली धक्कादायक आणि महत्त्वाची माहिती

Bandoda Jain Settlement: बांदोड्यातील प्राचीन जैन वस्ती आणि विजयनगर साम्राज्याचे सुवर्णयुग

Canacona Mega Housing Project: देळेत गृहनिर्माण प्रकल्पाला तीव्र विरोध; 15 दिवसांत निर्णय न घेतल्‍यास उपोषणाचा इशारा

Hardik Pandya New Look: हार्दिक पंड्याचा नवा अवतार चर्चेत; मुंडण करून महिका शर्मासोबत श्री वेंकटेश्वर स्वामींच्या चरणी नतमस्तक Watch Video

Santa Cruz BJP Office: बाबूश-रुडॉल्फमध्ये शब्दयुद्ध! सांताक्रुझमधील नवे कार्यालयावरून आरोप-प्रत्यारोप सुरू

SCROLL FOR NEXT