Dawood Ibrahim Dainik Gomantak
ग्लोबल

Don Dawood Ibrahim: अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने केले दुसरे लग्न, पाकिस्तानमधील राहते घरही बदलले

एनआयएने आपल्या आरोपपत्रात साक्षीदार म्हणून अलीशाहचे म्हणणे जोडण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमने (Don Dawood Ibrahim) दुसरे लग्न केले आहे. दाऊदची दुसरी पत्नी पाकिस्तानची रहिवासी असून पठाण कुटुंबातील आहे. अशी माहिती खुद्द दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर याने केला आहे.

अलीशाह हा दाऊदची बहीण हसिना पारकर (Hasina Parker) हिचा मुलगा आहे. अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणात नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (NIA) अलीशाहची चौकशी केली, त्यानंतर त्याने अनेक गुपिते उघड केली. एनआयएने आपल्या आरोपपत्रात साक्षीदार म्हणून अलीशाहचे म्हणणे जोडण्यात आले आहे.

अलीशाने एनआयएला दिलेल्या माहितीनुसार, दाऊद इब्राहिमने लग्न करण्यासाठी त्याची पहिली पत्नी महजबीन हिलाही घटस्फोट दिला, असे नाही. दाऊद इब्राहिमची पत्नी महजबीन हिला जुलै 2022 मध्ये तो दुबईत (Dubai) भेटला होता. तेव्हा त्याला या गोष्टी कळल्या. असे अलीशाने सांगितले.

दाऊद स्वत: कोणाशीही थेट संपर्क ठेवत नाही, परंतु त्याची पत्नी महजबीन प्रत्येक सण आणि प्रसंगी व्हॉट्सअॅप कॉलद्वारे (WhatsApp) भारतातील कुटुंबीयांशी संपर्कात राहते. असेही अलीशाहने सांगितले.

अलीशाहने दाऊदच्या पाकिस्तानातील नवीन ठिकाणाचाही खुलासा केला आहे. त्यानुसार दाऊदने आपले जुने निवासस्थान बदलले आहे. आता दाऊद कराचीतील अब्दुल गाझी बाबा दर्ग्यामागील रहीम फकीजवळील संरक्षण भागात राहतो.

गेल्या वर्षी अंडरवर्ल्ड टेरर फंडिंग प्रकरणी एनआयएने यूएपीए (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता, ज्यामध्ये छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रूटसह तीन जणांना अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT