Xi Jinping Dainik Gomantak
ग्लोबल

Protest Against Xi Jinping In China: हुकुमशाही नको, लोकशाही हवी! चीनमध्ये जिनपिंग यांच्या विरोधात लोक उतरले रस्त्यावर

राजीनाम्याची मागणी; सरकारच्या कठोर झीरो कोव्हिड पॉलिसीला विरोध

Akshay Nirmale

Protest Against Xi Jinping In China: चीनमध्ये एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागलेली असताना आता सरकारच्या झीरो कोव्हिड पॉलिसीविरोधात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागले आहेत. नागरिकांनी राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्याविरोधात घोषणबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

25 नोव्हेंबर रोजी शिनझियांग प्रांतातील एका अपार्टमेंटमध्ये आगीची घटना घडल्यानंतर नागरिकांचे हे आंदोलन आता आणखी तीव्र झाले आहे. झीरो कोव्हिड पॉलिसीनुसार लॉकडाऊनमुळे अग्निशमन दलाचे कर्मचारी आग विझविण्यासाठी वेळेत पोहचले नाहीत. त्यामुळे या दुर्घटनेत 10 नागरिकांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, चीनच्या शांघाय या प्रमुख शहरातही आंदोलकांनी लॉकडाऊन संपुष्टात आणण्याची मागणी केली आहे. सोशल मीडियावर आंदोलकांचे अनेक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओत लोक रस्त्यावर बॅनर घेऊन बसलेले दिसतात. या बॅनरवर, आम्हाला मानवाधिकार आणि स्वातंत्र्य हवे, अशा घोषणा लिहिल्या आहेत.

आणखी एका व्हिडिओमध्ये नागरिक जिनपिंग यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. जिनपिंग आणि कम्युनिस्ट पक्षाने सत्ता सोडावी, आम्हाला कोरोना चाचणीची गरज नाही. आम्हाला स्वातंत्र्य आहे. आम्हाला हुकुमशाही नको, तर लोकशाही हवी, असे या व्हिडिओमध्ये नागरिक म्हणताना दिसतात.

बीजिंगमधील विद्यापीठातही जवळपास 100 विद्यार्थी सरकारविरोधात आंदोलन करत आहेत. विद्यार्थ्यांनी भींतींवर 'नो टू लॉकडाउन, येस टू फ्रीडम, नो टू कोविड टेस्ट, येस टू फूड' अशा घोषणा लिहिल्या आहेत. काही सुरक्षारक्षक या घोषणा लपवत आहेत. आंदोलन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील, अशा धमक्याही दिल्या जात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT