spying Dainik Gomantak
ग्लोबल

पार्टनरची ऑनलाइन हेरगिरी करण्यात भारत तिसऱ्या क्रमांकावर; रिपोर्टमधून धक्कादायक खुलासा

Digital Violence: डिजिटल वायलन्स आणि स्टॉकरवेअर ॲप्सच्या वापरात वाढ झाल्याने तंत्रज्ञानाची काळी बाजू समोर येत आहे.

Manish Jadhav

Digital Violence: डिजिटल वायलन्स आणि स्टॉकरवेअर ॲप्सच्या वापरात वाढ झाल्याने तंत्रज्ञानाची काळी बाजू समोर येत आहे. रशियन सायबर सिक्युरिटी फर्म कॅस्परस्कीने या संदर्भात आपला नवीन रिपोर्ट जारी केला आहे. त्याचे नाव ‘स्टेट ऑफ स्टॉकरवेअर इन 2023’ असे आहे. या रिपोर्टमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगभरातील 31,031 मोबाइल वापरकर्ते स्टॉकरवेअर ॲप्सना बळी पडले आहेत.

रिपोर्टनुसार, जगभरातील सर्वेक्षणात 40 टक्के लोकांनी सांगितले की, ते ऑनलाइन छळाचे बळी ठरले आहेत. डिजिटल वायलन्स हा जगातील एक नवीन ट्रेंड आहे, ज्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर महिलांना शारीरिक, मानसिक किंवा सामाजिक नुकसान पोहोचवण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर, अँटी थेफ्ट, पॅरेंटल कंट्रोल ॲप किंवा इतर कोणत्याही ॲपद्वारे फोनमध्ये stalkerware ॲप गुप्तपणे इंस्टॉल केले जाते. याद्वारे ते फोनचे नोटिफिकेशन, लोकेशन, फोटो, कॅमेरा स्क्रीनशॉट, एसएमएस, कॅलेंडर आणि सोशल मीडिया अकाउंट्सवर नजर ठेवतात.

रिपोर्टमध्ये असे दिसून आले आहे की, स्टॉकरवेअरचे बळी दरवर्षी 5.8% वाढले आहेत, रशिया (9,890), ब्राझील (4,186) आणि भारत (2,492) सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत अग्रस्थानी आहेत. त्रासदायक बाब म्हणजे, रिपोर्टमध्ये असेही आढळून आले की, जगभरातील 23% लोकांना ते अलीकडेच डेटिंग करत असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून ऑनलाइन स्टॅकिंगचा सामना करावा लागला आहे.

कसे टाळावे?

स्टॉकरवेअर टाळण्यासाठी, जे ॲप वापरात नाहीत ते आधी काढून टाका. सिक्युरिटी सॉफ्टवेअर वापरले जाऊ शकते. याशिवाय, फॅक्टरी रिसेटचा पर्यायही उपयुक्त ठरु शकतो. मात्र, तज्ज्ञांच्या मते, सर्वप्रथम स्थानिक सायबर क्राईम संस्थेची मदत घेतली पाहिजे. असा धोका टाळण्यासाठी फोन नेहमी यूनिक पासवर्डने लॉक ठेवा आणि तो कोणाशीही शेअर करु नका. कोणतेही ॲप नेहमी अधिकृत सोर्सकडूनच डाउनलोड करा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: ईशान किशन ठरला 'हिरो', गोलंदाजांनी मोडलं पाकड्यांचं कंबरडं; हायहोल्टेज सामन्यात भारताचा 61 धावांनी दणदणीत विजय

IND vs PAK: पाकड्यांची ना बॅालिंग चालली, ना बॅटिंग! टीम इंडियाच्या 'डबल अटॅक'ने पाकिस्तानचा उडवला धुव्वा, 61 धावांनी पराभव

IND vs PAK: 'भारत जादूटोणा करुन जिंकतो...', पाकिस्तानी क्रीडा विश्लेषकाचा अजब दावा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर वर्ल्ड कपमध्येही तेच रडगाणं

IND vs PAK: युवराजचा रेकॉर्ड मोडला, कोहलीच्या क्लबमध्ये एन्ट्री! ईशान किशनचा पाकिस्तानविरुद्ध धमाका; बनला नवा 'सिक्सर किंग'

VIDEO: 10 चौकार 3 षटकार... खतरनाक ईशान किशन! पाकड्यांना धु धु धुतलं, तुफान फटकेबाजी व्हिडिओ पाहा

SCROLL FOR NEXT