Dhirendra Krishna Shastri Dainik Gomantak.
ग्लोबल

Dhirendra Shastri: 'कोहिनूर घेऊनच परत येईन' धीरेंद्र शास्त्रींचे लंडनमध्ये वक्तव्य

Dhirendra Shastri: आता आम्ही इंग्लड मध्ये येऊन बोलतो आणि हे लोक ऐकतात.

दैनिक गोमन्तक

Dhirendra Shastri: बागेश्वर धामचे पंडीत धीरेंद्र शास्त्री अलीकडे आपल्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असतात. त्यांच्या वक्तव्यावरुन मोठा वाददेखील निर्माण झाला होता. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत.

सध्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री लंडन येथे एका कार्यक्रमासाठी गेले असून तेथे केलेल्या वक्तव्यामुळे पून्हा चर्चेत आले आहेत. व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत धीरेंद्र शास्त्री आपल्या भक्तांना रामकथा सांगत असताना म्हणतात की, मला भारतातून वारंवार फोन येत असून मी भारतात परत कधी येणार हे विचारत आहेत.

मी त्यांना सांगितले आहे , 'आता मला इंग्लडमध्ये छान वाटत आहे. काळजी करु नका कोहिनूर हीरा घेऊनच परत येऊ. पुढे बोलताना म्हणतात- आधी इंग्रज भारतात येऊन बोलायचे आणि आपले पूर्वज ऐकून घ्यायचे आता आम्ही इंग्लड मध्ये येऊन बोलतो आणि हे लोक ऐकतात. मात्र हे लोक चांगले आहेत. इंग्लडचे कल्याण होऊ दे' असेही धीरेंद्र शास्री म्हणताना दिसतात.

कोहिनूर हिरा संपूर्ण जगातला असणाऱ्या सुंदर हिऱ्यापैकी एक आहे. याबरोबरच तो महागड्या हिऱ्यापैकी एक असल्याचे म्हटले जाते. 105.6 कॅरेटचा असणाऱ्या या हिऱ्याबद्दल अशी आख्यायिका आहे की, या अद्वितिय हिऱ्याचा कधीच व्यवहार झाला नाही.

एकतर हा हिरा युद्धात जिंकला गेला किंवा एका शासकाने दुसऱ्या शासकाला भेट म्हणून दिल्याचे म्हटले जाते. सद्यस्थितीत हा हिरा ब्रिटनच्या राजघराण्यात असून कोहिनूरला ब्रिटिश ताजचा गौरव म्हटले जाते.

दरम्यान, भारताला हिंदू राष्ट्र करण्याच्या विधानामुळे धीरेंद्र शास्त्री मोठ्या चर्चेत आले होते. याबरोबरच धीरेंद्र शास्त्री आणि त्यांचे सहकारी भोंदूगिरी करतात हा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता. त्यानंतरही त्यांचे भक्त जगभर दिसून येतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: ‘सोनारा’ने घातला 23 लाखांचा गंडा! अनेकांची फसवणूक; पेडणे पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Live Updates: प्रश्न सुटेपर्यंत मागे फिरणार नाही; पिळगावातील महिलांचा निर्धार

CM Pramod Sawant: युवकांनी FIT INDIA साठी एकत्र यावे; साखळी युवा उत्सव उद्‌घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचे आवाहन

Blitz Chess Tournament: ब्लिट्झ स्पर्धेत एथन वाझचा डंका! पुन्हा अपराजित कामगिरी

Siolim Crime: वाल्लोर!! शिवोलीतील तरुणाने केले दरोडेखोरांशी दोनहात; चाकूचे वार सहन करत हणून पाडला चोरीचा डाव

SCROLL FOR NEXT