Bageshwar Dham Dainik Gomantak
ग्लोबल

Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्रींना Y कॅटेगरी सुरक्षा, 4 महिन्यांपूर्वी आली होती जिवे मारण्याची धमकी

Dhirendra Shastri: Y श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर एक-दोन कमांडो धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत राहतील. यासोबतच त्यांच्या सुरक्षेमध्ये पोलिसांसह आठ जवानांचाही समावेश असेल.

Manish Jadhav

Dhirendra Shastri Gets Y-category Security Cover: बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांना Y श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्र सरकारने याबाबत आदेश जारी केला. Y श्रेणीची सुरक्षा मिळाल्यानंतर एक-दोन कमांडो धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत राहतील. यासोबतच त्यांच्या सुरक्षेमध्ये पोलिसांसह आठ जवानांचाही समावेश असेल.

दरम्यान, चार महिन्यांपासून त्यांना कुटुंबासह जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. बागेश्वर धाम सरकार उर्फ ​​धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे प्रसिद्ध कथाकार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून ते खूप चर्चेत आहेत. अमर सिंह नावाच्या व्यक्तीने त्यांना यापूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली होती. धीरेंद्र शास्त्री यांच्या चुलत भावाच्या नंबरवर हा धमकीचा फोन आला होता.

'तेराव्याची तयारी करा'

धमक्या देणाऱ्या व्यक्तीने म्हटले होते की, 'धीरेंद्र शास्त्री आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या तेराव्याची तयारी करा.' यानंतर धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे बंधू लोकेश यांनी एफआयआर (FIR) दाखल केला होता. त्यामुळेच त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धीरेंद्र शास्त्री सनातन धर्माच्या रक्षणासाठी आवाज उठवतात आणि हिंदू राष्ट्राबद्दल बोलत असतात.

हिंदू राष्ट्र बनवण्याचे ध्येय ठेवा

सनातन धर्माचे रक्षण करणे आणि देशाला हिंदू राष्ट्र बनवणे हे त्यांचे ध्येय असल्याचे बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्री सांगतात. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात लाखो भाविकांची गर्दी होते. नुकतेच धीरेंद्र शास्त्री बिहारला (Bihar) गेले होते. बिहारमध्ये त्यांच्या कार्यक्रमाला लाखो भाविकांनी गर्दी केली होती. यादरम्यान राजकीय गदारोळही झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

कणखर गृहमंत्री ते संवेदनशील कृषीमंत्री: रवी नाईक यांच्या व्यक्तिमत्त्वाचं मुख्यमंत्री फडणवीसांकडून गौरवोद्गार

Ravi Naik: 'मी फक्त पुढे, सेनापती मात्र रवीच'; दिवंगत नेत्याला भावनिक आदरांजली

Horoscope: 71 वर्षांनंतर महासंयोग! यंदाची दिवाळी 5 शुभ योगांची, 'या' राशींचे भाग्य उजळणार; शुभ कार्यांसाठी सर्वोत्तम काळ

1310-1312 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या मोठ्या सैन्याने कोकणात प्रवेश केला, कदंबांची गोव्यातील राजधानी गोपकपट्टणाचा नाश केला..

Mini Narkasur: दिवाळीची लगबग! 'मिनी नरकासुर' विक्रीसाठी सज्ज; किंमत वाचून थक्क व्हाल

SCROLL FOR NEXT