Russia Ukraine War Consequences Dainik Gomantak
ग्लोबल

व्यवहार बंद! ड्यूश बँकचे रशियामध्ये व्यवसाय संपुष्टात

दैनिक गोमन्तक

रशियाशी सुरू असलेल्या संबंधांमुळे काही गुंतवणूकदार आणि राजकारण्यांकडून तीव्र टीकेचा सामना करणाऱ्या ड्यूश बँक (DBKGn.DE) ने शुक्रवारी सांगितले की ते देशातील आपला व्यवसाय बंद करणार आहेत. (Deutsche Bank has closed its business in Russia)

मॉस्कोच्या युक्रेनवरील आक्रमणानंतर बाहेर पडणाऱ्या पहिल्या प्रमुख यूएस बँका असलेल्या गोल्डमन सॅक्स (GS.N) आणि JPMorgan Chase (JPM.N) च्या रांगेत ड्यूश सामील झाले आहे. ड्यूश बँक (DBKGn.DE) ने शुक्रवारी सांगितले आहे की, ते रशियामधील (Russia) आपला व्यवसाय बंद करणार आहे.

"आम्ही रशियातील आमचा उरलेला व्यवसाय संपुष्टात आणण्याच्या प्रक्रियेत आहोत, तर आम्ही आमच्या गैर रशियन बहुराष्ट्रीय ग्राहकांना त्यांचे कामकाज कमी करण्यात मदत देखील करतो," असे बँकेने म्हटले आहे. "रशियामध्ये कोणताही नवीन व्यवसाय होणार नाही," असेही ड्यूश म्हणाले आहे.

रशियामध्ये व्यवसाय करणार्‍या बहुराष्ट्रीय कंपन्यांना समर्थन देणे आवश्यक झाले आहे असा युक्तिवाद करून ड्यूशने संबंध तोडण्याच्या प्रतिकार केला होता. पण फ्रँकफर्टमध्ये शुक्रवारी संध्याकाळी बँकेने अचानक उलटी चाल करत डाव पलटलला असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

रस्त्यांच्या अवस्थेवरुन काँग्रेस आक्रमक; दहा दिवसांत काम सुरु न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा

फोंड्यात 'हेडा गॅब्लर'चा प्रयोग; 125 वर्षापूर्वी लिहलेले नोर्वेजियन नाटककाराचे नाटक पाहण्याची संधी

SCROLL FOR NEXT