Defence Minister Rajnath Singh give Special message to new Pakistan PM Shehbaz Sharif from America Dainik Gomantak
ग्लोबल

काश्मीरसाठी रडणाऱ्या पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना राजनाथ सिंहांचा अमेरिकेतून खास संदेश

शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होताच काश्मीरचे गोडवे गाणे सुरू झाले आहे.

दैनिक गोमन्तक

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले असून त्यांना एक संदेशही दिला आहे. 'आपल्या शेजारी देशाचे (Pakistan) नवे पंतप्रधान (Shehbaz Sharif) यांना एकच संदेश पाठवायचा आहे, तो म्हणजे त्यांनी आपल्या देशातील दहशतवादाला आळा घालण्यात यश मिळवावे यासाठी त्यानी प्रयत्न करावे,' असा संदेश राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांना दिला. राजनाथ सिंह 2+2 चर्चेसाठी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी शाहबाज शरीफ यांना हा संदेश दिला आहे. (Defence Minister Rajnath Singh give Special message to new Pakistan PM Shehbaz Sharif from America)

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शाहबाज शरीफ यांचे अभिनंदन केले. मियां मुहम्मद शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन, भारत दहशतवादापासून मुक्त असलेल्या प्रदेशात शांतता आणि स्थैर्य मिळवू इच्छितो, जेणेकरून आम्ही आमच्या विकासाच्या आव्हानांवर लक्ष केंद्रित करू शकू आणि आमच्या लोकांचे कल्याण आणि समृद्धी सुनिश्चित करू शकू, असे ट्विट पंतप्रधान मोदी त्यांनी केले.

शाहबाज शरीफ काश्मीरचे गोडवे गात आहेत

शाहबाज शरीफ पंतप्रधानपदी विराजमान होताच काश्मीरचे गोडवे गाणे सुरू झाले आहे. पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांना संदेश देताना त्यांनी काश्मीर प्रश्न काश्मिरी जनतेच्या इच्छेनुसार सोडवला पाहिजे, असे म्हटले आहे. आम्हाला भारतासोबत चांगले संबंध हवे आहेत, पण जोपर्यंत काश्मीर प्रश्नावर शांततापूर्ण तोडगा निघत नाही तोपर्यंत ते शक्य नाही, असे शेहबाज शरीफ म्हणाले.

शाहबाज शरीफ म्हणाले की, आम्ही काश्मिरी जनतेला त्यांच्या अवस्थेवर सोडू शकत नाही. राजनैतिकदृष्ट्या आम्ही काश्मिरी जनतेला आमचा पाठिंबा देत राहू. काश्मीरमधील गरिबी संपली पाहिजे, असे शाहबाज शरीफ म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT