Ship  Dainik Gomantak
ग्लोबल

Greece: निर्वासितांच्या वाट्याला अखेर मरणचं! ग्रीसमध्ये 400 प्रवाशांसह जहाज बुडाले 79 जणांचा मृत्यू

Greece: आत्तापर्यत 104 लोकांना वाचवण्यात यश आले असून अजूनही हे बचावकार्य सुरु आहे.

दैनिक गोमन्तक

Greece: ग्रीसमध्ये एक जहाज बुडून 79 लोक मृत्यू पावल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. दक्षिणी पेलोपोनिसे क्षेत्रापासून जवळजवळ 75 किलोमीटर दूर ही घटना घडली आहे.

या घटनेत आतापर्यत 79 लोकांचा मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक बेपत्ता झाल्याची माहीती समोर आली आहे. या घटनेची माहीती मिळताच तत्काळ रेस्क्यू ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

आत्तापर्यत 104 लोकांना वाचवण्यात यश आले असून अजूनही हे बचावकार्य सुरु आहे. या पीडीतांना उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. या प्रवाशांमध्ये विविध देशांच्या नागरिकांचा समावेश होता. इजिप्तचे 30 , पाकिस्तानचे 10 , सिरियाचे 35 आणि दोन पॅलेस्टाइनचे नागरिक आहेत. हे नागरिक निर्वासित असल्याची माहीती समोर आली आहे.

तटरक्षक दलाच्या म्हणण्यानुसार, जहाजातले किती लोक बेपत्ता आहेत याची हे नेमके सांगता येणार नाही, या बचावकार्यात तटरक्षक दल नौसेना आणि वायूसेनेचा देखील समावेश आहे. इटलीला चाललेले हे जहाज लीबीयाच्या टोब्रुकमधून रवाना झाल्याची माहीती समोर आली आहे.

वाचवलेल्या लोकांना कलामाता शहरात घेऊन जात आहेत. कलामाता येथील महापौर म्हणाले, या लोकांचे वय 16 ते 41 दरम्यान आहे. या जहाजात महिला आणि लहान मुलांचादेखील समावेश आहे.

संयुक्त राष्ट्रांने ट्वीट करत म्हटले आहे की, जहाजात 400 लोक होते. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी जहाज बुडण्याची घटना भयावह असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Money Laundering Case: धर्मांतरण रॅकेटचा मास्टरमाइंड छंगूर बाबाच्या साम्राज्यावर ईडीचा घाला! मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी 13 कोटींची मालमत्ता जप्त

Viral Video: चांगलीच खोड मोडली! जिवंत कोळंबी खाण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोरीचा व्हिडिओ व्हायरल; नेटकऱ्यांनी उठवली टीकेची झोड

Ro-Ro Car Train Service: गणेशोत्सवापूर्वी कोकण रेल्वेची पहिली रो-रो कार ट्रेन गोव्यात दाखल, जाणून घ्या भाडे?

Porvorim: ओ कोकेरो ते मॉल दी गोवा रस्ता 5 दिवसांच्या गणेश चतुर्थीनंतरच होणार बंद; CM सावंतांनी केले स्पष्ट

Asia Cup 2025: टी-20 आशिया कपमध्ये भारताच्या नावावर 'महा कीर्तिमान'! 'या' संघाविरुद्ध उभारला धावांचा डोंगर; यंदा कोण मोडणार टीम इंडियाचा रेकॉर्ड?

SCROLL FOR NEXT