Covishield was recognized by nine European countries Dainik Gomantak
ग्लोबल

'या' नऊ युरोपीय देशांनी 'कोविशील्ड' ला दिली मान्यता

शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडनेही (Switzerland) कोविशील्डला (Covishield) मान्यता देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

दैनिक गोमन्तक

युरोपमधील (Europa) ऑस्ट्रिया, जर्मनी, स्लोव्हेनिया, ग्रीस, आइसलॅंड, आयर्लंड आणि स्पेन या देशात कोविशील्ड लस घेतलेल्यांना प्रवासाठी मान्यता देण्यात आली आहे. शेंझेन देश म्हणून स्वित्झर्लंडनेही (Switzerland) कोविशील्डला (Covishield) मान्यता देत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

याशिवाय, इस्टोनियाला जे भारतीय जाणार आहेत, त्यांच्या बाबतीत भारत सरकारने प्राधिकृत केलेल्या कोरोना लसींना आपण मान्यता देणार असल्याचे त्या देशांनी सांगितले आहे. ज्या भारतीय लोकांनी कोव्हॅक्सिन, कोविशील्ड या लसी घेतल्या आहेत आणि जे युरोपीय देशांमध्ये जाऊ इच्छितात त्यांना परवानगी देण्यासबंधी विचार करण्यात यावा, अशी विनंती भारत सरकारने याआगोदरच युरोपीय महासंघाच्या (European Union) सदस्य देशांना केली आहे.

कोरोना महामारीच्या (Covid 19) काळामध्ये मुक्तपणे प्रवास करण्यात यावा यासाठी युरोपीय महासंघाचे डिजिटल कोविड प्रमाणपत्र गुरुवारपासून अमलात येणार आहे. त्याच्या व्यवस्थेनुसार, युरोपीय औषध यंत्रणेमार्फत प्राधिकृत करण्यात आलेल्या लसी घेतलेल्या प्रवाशांना युरोपीय महासंघ क्षेत्रामध्ये प्रवासविषयक निर्बंधपासून सूट देण्यात येणार आहे.

याव्यतिरिक्त, राष्ट्रीय पातळीवर प्राधिकृत करण्यात आलेल्या किंवा जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिलेल्या कोरोना लसींना स्वीकृती देण्याची मुभा सदस्य देशांना वैयक्तिकरित्या असणार आहे.. ज्या प्रवाशांना कोव्हॅक्सिन आणि कोविशील्ड लस घेतली आहे, त्यांना ग्रीन पास योजनेंतर्गत युरोपीय महासंघाच्या सदस्य देशांमध्ये प्रवास करण्यासाठी पात्र ठरवण्यात येणार असल्याची शक्यता कमी आहे, अशी शंका भारतात व्यक्त करण्यात येत आहे.

झायडस कॅडिला चा कोरोना प्रतिबंधक लसीसाठी अर्ज

झायकोव्ह-डी (Zykov-D) या कोरोना प्रतिबंधक लसीच्या वापराला भारताकडून परवानगी मिळवण्यासाठी आपण डीसीजीआयकडे अर्ज केला असल्याचे झायडस कॅडिला कंपनीने (Zydus Cadillac Company) गुरुवारी सांगितले. भारतामधील 50 केंद्रावर आतापर्यंतची सर्वात मोठी नैदानिक चाचणी केली असल्याचे माहिती कंपनीने दिली आहे. डीसीजीआय कार्यालमध्ये आपल्या झायकोव्ह-डी या कोरोना प्रतिबंधक प्लाझ्मिड डीएनए लसीच्या आपत्कलीन वापरासाठी अर्ज केला आहे, असे झायडस कॅडिलाने एका निवेदनामध्ये म्हटले आहे. या लसीला मान्यता मिळवण्यासाठी ती केवळ जेष्ठ न्वहे तर 12-18 वयोगटातील तरुणांसाठी फायदेशीर ठरेल, असेही कॅडिला हेल्थकेअरचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. शर्विल पटेल म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT