Aeroplane Dainik Gomantak
ग्लोबल

Covid19 Positive आल्यावर बुर्खा घालुन पत्नीच्या नावाने केला प्रवास

पत्नीच्या ओळखपत्रांच्या आधारे प्रवास करणाऱ्या या व्यक्तीला विमानातील (Aeroplane) कर्मचाऱ्याने विमानाच्या बाथरूममध्ये जाताना पाहिले आणि डाव फसला.

दैनिक गोमन्तक

प्रवास करण्यासाठी आता सगळीकडेच कोरोना निगेटिव्ह असल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य झाले आहे. अशातच इंडोनेशियात कोरोना पॉझीटीव्ह (Covid19 Positive) असलेल्या एका प्रवाशाने विमानातुन प्रवास करण्याचा एक अनोखा मार्ग शोधला. या व्यक्तीने बुरखा घालुन थेट आपल्या पत्नीच्या ओळखपत्रांच्या आधारे जकार्ता ते टर्नेटकडे देशांतर्गत विमानाने प्रवास केला. स्थानिक वृत्तसंस्थांच्या अहवालानुसार या व्यक्तीचा कोरोना अहवाल सकारात्मक आला पण त्याची पत्नी मात्र निगेटिव्ह होती. याचाच फायदा घेत या महाशयांनी आपल्या पत्नीचे ओळखपत्र वापरुन हा विमान प्रवास केल्याचे समोर आले आहे. (Covid19 Positive traveled in the name of his wife wearing a burqa)

पत्नीच्या ओळखपत्रांच्या आधारे प्रवास करणाऱ्या या व्यक्तीला विमानातील कर्मचाऱ्याने विमानाच्या बाथरूममध्ये जाताना पाहिले मात्र त्यानंतर बाहेर पडताना बुर्ख्याऐवजी पुरुषांचे कपडे घालून बाहेर पडताना दिसला. फ्लाइट अटेंडंटने या प्रकरणाची माहिती टर्नेट विमानतळ प्राधिकरणाला दिली आणि त्यानंतर विमान उतरताच त्या व्यक्तीला पकडण्यात आले.

विमानतळावर उपस्थित आरोग्य अधिकाऱ्यांनी या व्यक्तीची पुन्हा RTPCRद्वारे तपासणी केली आणि त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे आढळले. यानंतर विमानतळ प्राधिकरणाने PPE किट घालुन रुग्णवाहिकेतून त्यास विमानतळाबाहेर काढले. त्या व्यक्तीला टर्नेट शहरातील त्याच्या घरी अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही व्यक्ती कोरोना निगेटिव्ह झाल्यानंतर स्थानिक पोलीस त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करणार आहेत. इंडोनेशियामध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sheikh Hasina: बांगलादेश हिंसाचार प्रकरणात शेख हसीना दोषी, न्यायालयाकडून फाशीची शिक्षा

DYSP यांच्या कार्यालयाजवळ 'ती' विकायची नारळपाणी, बँकेच्या मॅनेजरला हनीट्रॅपमध्ये अडकवलं; पण, ब्लॅकमेल करुन 10 लाख उकळण्याचा डाव फसला

Viral Post: 'तुम हारने लायक ही हो...' आफ्रिकेविरूध्द टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव, दिग्गज खेळाडूची पोस्ट व्हायरल

'IFFI 2025' मध्ये गोव्यातील 2 चित्रपटांना संधी! मिरामार, वागातोर किनाऱ्यांसह मडगावच्या रविंद्र भवनात 'Open-air Screening' ची मेजवानी

Goa Police: 5000 पेक्षा अधिक कॉल, 581 तक्रारींवर तत्काळ कार्यवाही; सायबर गुन्ह्यांना 100% प्रतिसाद देणारं 'गोवा पोलीस' दल देशात अव्वल

SCROLL FOR NEXT