जगभरात कोरोनाचा (Covid 19) प्रादूर्भाव काही झाल्या कमी होत नसताना दुसरीकडे मात्र कोरोनाला आळा घालण्यासाठी अनेक औषधे बाजारात उपलब्ध होत आहेत. यातच आता अमेरिकेतून (America) आलेले एक नवीन औषध कोरोनाच्या उपचारावर प्रभावी ठरत असल्याचे सांगितले जात आहे. मर्क अँड कंपनीने दावा केला आहे की, हे औषध मोलनूपिरावीर (molnupiravir) गंभीर रुग्णांमध्ये मृत्यू किंवा हॉस्पिटलायझेशनची गरज 50 टक्क्यांनी कमी करु शकते. कंपनीने पुढे असेही म्हटले आहे की, ''हे औषध तोंडाद्वारे देण्यात येते. शेवटच्या क्लिनिकल ट्रायलमध्ये हे औषध यशस्वी ठरले आहे. आम्ही अमेरिकेत या औषधासाठी आपत्कालीन परवानगी घेण्याची योजना आखत आहोत.''
दरम्यान, 775 लोकांवर ही क्लिनिकल ट्रायल करण्यात आली असून फेज -3 च्या अभ्यासाचे अंतरिम विश्लेषण असे आढळून आले की, मॉलूपीरावीरने उपचार केलेल्या 7.3 टक्के रुग्णांना 29 दिवसांच्या आत रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्लेसबो प्राप्त झालेल्या रूग्णांपैकी 14.1 टक्के रुग्ण रुग्णालयात दाखल झाले किंवा 29 तारखेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. प्लेसबो-उपचारित रुग्णांमध्ये आठ रुग्णांच्या मृत्यूंच्या तुलनेत 29- दिवसांच्या कालावधीमध्ये मोलनूपिरवीर देण्यात आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला नसल्याचे आढळून आले आहे.शि
शिवाय, कोरोनाची लक्षणे सुरु होण्याच्या वेळेस किंवा अंतर्निहित जोखीम घटकामुळे औषधाच्या प्रभावितेवर कोणत्याही स्वरुपाचा परिणाम झाला नाही. याव्यतिरिक्त, उपलब्ध व्हायरल सिक्वेंसींग डेटासह सहभागींवर आधारित (अंदाजे 40 टक्के सहभागी), मोलनूपीरवीरने व्हायरल व्हेरियंट गामा, डेल्टा आणि म्यू मध्ये सातत्यपूर्ण परिणामकारकता दर्शविली आहे.
मर्कचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष रॉबर्ट एम डेव्हिस (Robert M. Davis) यांनी निवेदनात म्हटले आहे, "आम्ही आशावादी आहोत की कोरोना महामारीच्या आजाराशी लढा देण्याच्या जागतिक प्रयत्नांचा भाग म्हणून मोलुपिरावीर एक महत्त्वाचे औषध बनू शकेल."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.