Covid19 infection is on the rise in young children in the United States Dainik Gomantak
ग्लोबल

अमेरिकेत लहान मुलांमध्ये वाढतोय कोरोना; आकडेवारी धक्कादायक

American Academy of Pediatrics: मागील आठवड्यात अमेरिकेत 94,000 हून अधिक मुलांना संसर्ग कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोनाच्या (Covid19) विळख्यातुन जग मुक्त होत असतानाच, अमेरिकेतुन येणारी एक बातमी चिंता वाढवणारी ठरते आहे. कारण आता अमेरिकेत कोरोना विषाणु पुन्हा डोकं वर काढताना दिसतो आहे. मागील आठवड्यात अमेरिकेत 94,000 हून अधिक मुलांना (Covid19 in Childrens) संसर्ग कोरोना संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. द अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सने (American Academy of Pediatrics) दिलेल्या माहितीनुसार एकूण कोरोना संक्रमित रुग्णांपैकी 15 टक्के मुलं आहेत. मात्र दिलासा वाढवणारी बाब आहे की संक्रमित मुलांना तीव्र लक्षणं आढळुन येत नाहीत. त्यामुळे या कोरोनाग्रस्त मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागेल अशा केसेस अत्यंत कमी आहेत. कोरोना संसर्गामुळे मरण पावलेल्या मुलांचे प्रमाण 0.00 ते 0.03 टक्के आहेत. आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार 5 ऑगस्टपर्यंत सुमारे 43 लाख मुलांना संसर्ग झाला आहे. (Covid-19 virus infection is on the rise in young children in the United States.)

अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्सच्या (AAP) अहवालानुसार, जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून मुलांच्या संसर्गाचे प्रमाण सतत वाढत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे शाळा पुन्हा सुरू केल्या गेल्याचे समजते आहे. रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राच्या (CDC) च्या आकडेवारीनुसार, 5 ते 11 आणि 11 ते 15 वयोगटातील मुले 50 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांपेक्षा जास्त आजारी पडत आहेत.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थचे संचालक डॉ. फ्रांसिस कोलिंस यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या राज्यांमध्ये मास्क सक्तीने वापरले जात नाही त्या ठिकाणी परिस्थिती बिकट आहे. आतापर्यंत, अमेरिकेत 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 60 टक्के मुलांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सुमारे 70 टक्के मुलांना एकच डोस मिळाला आहेत, तर 12 वर्षांखालील मुलांसाठी ही लस अद्याप मंजूर झालेली नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT