China Citizens Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये कोरोनाचा पुन्हा हाहा:कार, डेल्टाच्या रुग्णामध्ये वाढ

राजधानी बिजिंगसह (Beijing) चीनमधील इतर 15 शहरांमध्ये डेल्टाचा प्रसार वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे.

दैनिक गोमन्तक

जगभरात कोरोनाचा प्रसार (Covid19) पुन्हा एकदा वाढू लागला असताना दुसरीकडे चीनमध्ये (China) कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) रुग्णांमध्ये वाढ होऊ लागली आहे. राजधानी बिजिंगसह चीनमधील इतर 15 शहरांमध्ये डेल्टाचा प्रसार वाढला असल्याचे निदर्शनास आले आहे. चीनच्या सरकारी माध्यामाने डिसेंबर 2019 मध्ये वुहानमधून कोरोनाचा प्रसार वाढू लागल्यानंतर कोरोनाच्या हाहाकाराला देशांतर्गत सर्वात व्यापक घरगुती रोगाचा प्रसार म्हणून घोषित होते. ग्लोबल टाइम्स सांगितले की, नव्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंट रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात ही चीनच्या पूर्व जिआंगसु प्रांताची (Jiangsu province) राजधानी नानजिंगच्या (Nanjing) विमानतळावरुन झाली आणि इतर पाच प्रांतासह बीजिंग (Beijing) नगरपालिकेतपर्यंत वाढत गेली.

ग्लोबल टाइम्सकडून सांगण्यात आले की, नानजिंग शहरातील विमातळावरील कर्मचारी कोविड पॉझिटिव्ह आल्यानंतर तात्काळ हवाई उड्डाणे रद्द करण्यात आली. वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरिएंटचे रुग्ण 15 चीनी शहरामंध्ये वाढत असल्याचे समोर आले आहे. डेल्टा व्हेरिएंटचा पहिला रुग्ण भारतामध्ये आढळला होता. डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्येत पुन्हा एकदा वाढ होऊ लागल्याने आरोग्य प्रशासनाकडून सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे. अधिकाऱ्यांच्या चिंतेचे मुख्य कारण म्हणजे बिजिंगमध्ये मागील वेळेस आढलेल्या कोरोना रुग्णांच्या 175 दिवसानंतर अचानक रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.

बिजिंगमध्ये हवाई उड्डाणांना थेट एंट्री बंद

सुमारे 2.2 करोड़ लोकसंख्या असलेल्या बिजिंगमध्ये स्थानिय सरकारने एक जुलैला आयोजित केलेल्या चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी समारोहासाठी मागील काही महिने शहराचा कोरोनापासून बचाव केला. राजधानीच्या ठिकाणी चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. चीनकडून भारतासह अन्य देशांसाठी पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक सुरु होणे बाकी आहे. बिजिंगमध्ये येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्लाइट्स त्या अन्य शहरांकडे वळविण्यात आल्या आहेत. प्रवाशांना बिजिंगमध्ये प्रवास करण्यापूर्वी 21 दिवस क्वारंटाइन रहावे लागते.

40 टक्के चीनी नागरिकांचं लसीकरण पूर्ण

राष्ट्रीय आरोग्य आयोगानुसार, चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या एकूण 92,875 एवढी झाली आहे. त्यापैकी 932 रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. तसेच 25 रुग्णांची स्थिती चिंताजनक आहे. देशात मागील वर्षापासून ते आतापर्यंत कोरोनामुळे 4,636 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आधिकारीकदृष्ट्या, चीनमधील 40 टक्के नागरिकांचं लसीकरण करण्यात आले आहे. कोरोनाचा पहिला रुग्ण चीनमधील वुहान शहरामध्ये आढळून आला होता. त्याच्यानंतर चीन आणि जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत गेला. मार्च 2020 मध्ये जागतिक आरोग्य संघटनेकडून कोरोनाला महामारी घोषित करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia's Tallest Ram Statue in Goa: ऐतिहासिक क्षण! PM नरेंद्र मोदींच्या हस्ते आशियातील सर्वात उंच 'श्रीरामांच्या मूर्ती'चं अनावरण Watch Video

IND vs SA, 1st ODI: रोहित-कोहलीची जोडी रचणार नवा इतिहास! मैदानात उतरताच मोडणार सचिन-द्रविडचा रेकॉर्ड; बनणार नंबर-1 भारतीय जोडी

IFFI Goa 2025: इफ्फीच्या रेड कार्पेटवर धनुष-क्रिती सेनॉनचा जलवा; 'तेरे इश्क में'च्या गाला प्रीमिअरला लावली हजेरी! Watch Video

श्रीलंकेत ‘दित्वा’ चक्रीवादळाचा हाहाकार! पूर आणि भूस्खलनात 47 जणांचा मृत्यू, 21 बेपत्ता; भारतालाही धोक्याचा इशारा VIDEO

Partgali Math Goa: पैंगिणीतल्या 'पर्वत कानन' स्थळी मूर्ती जड झाल्या, गायीने प्रकट होऊन जागा दाखवली; श्रीसंस्थान गोकर्ण पर्तगाळ

SCROLL FOR NEXT