Covid-19 Dainik Gomantak
ग्लोबल

कोरोना व्हायरस करु शकतो कॅन्सरग्रस्त रुग्णांचा इलाज? नव्या अभ्यासाने डॉक्टरही चकित; वाचा सविस्तर

कोरोना व्हायरसने अनेकांचे जीवन आणि घरे उद्ध्वस्त केली. कोरोनाची लागण झालेल्या लोकांमध्ये अजूनही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात.

Manish Jadhav

कोरोना व्हायरसने अनेकांचे जीवन आणि घरे उद्ध्वस्त केली. कोरोना होऊन गेलेल्या लोकांमध्ये अजूनही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. दरम्यान, या व्हायरसशी संबंधित एक सकारात्मक बातमी समोर आली आहे. काही डॉक्टरांना वाटते की, कोरोना व्हायरस कॅन्सरच्या उपचारात उपयुक्त ठरु शकतो. कॅन्सरग्रस्त रुग्णांना कोरोना झाल्यानंतर त्यांच्या ट्यूमरचा आकार कमी झाला. हे पाहून डॉक्टरांनाही आश्चर्य वाटले आणि त्यांनी एक अभ्यास केला, ज्याच्या रिझल्टमुळे संशोधकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

दरम्यान, कोरोना व्हायरस आणि कॅन्सरशी संबंधित हे संशोधन नॉर्थवेस्टर्न मेडिसिन कॅनिंग थोरॅसिक इन्स्टिट्यूटमध्ये करण्यात आले. ते नोव्हेंबरमध्ये जर्नल ऑफ क्लिनिकल इन्व्हेस्टिगेशनमध्ये प्रकाशित होणार आहे. कोरोनाची लागण झालेल्या लोकांच्या ट्यूमरचा आकार कमी झाला किंवा हळूहळू वाढल्याचं दिसून आलं. यावर विद्यापीठ प्रमुख अंकित भरत यांनी सांगितले की, 'हे योग्य आहे की नाही हे आम्हाला रुग्ण आजारी असल्यामुळे कळले नाही. बहुदा असेही घडले असेल की, रोगप्रतिकारकशक्ती इतकी सक्रिय झाली की त्यामुळे कॅन्सरच्या सेल्सही मारण्यास सुरुवात झाली?

काही प्रकरणे पाहिल्यानंतर, डॉक्टरांनी त्यांच्या टीमसह याबद्दल अधिक माहिती गोळा करण्यासाठी अभ्यास केला. डॉ. भरत आणि त्यांच्या टीमने शोधून काढले की, जेव्हा SARS-CoV-2 शरीरात असतो तेव्हा शरीरातील मोनोसाइट सेल्स वेगळ्या पद्धतीने रिअॅक्ट करतात. सामान्य परिस्थितीत, मोनोसाइट्स रक्तामध्ये फिरतात आणि जेव्हा कोणतीही खराब सेल किंवा धोका आढळतो तेव्हा सावध करतात. काही मोनोसाइट्स कॅन्सरशी लढणाऱ्या सेल्संना ट्यूमरमध्ये घेऊन जातात. परंतु कॅन्सरच्या सेल्स कधीकधी मोनोसाइट्सला चकवा देतात.

डॉक्टरही चकित

अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोरोना विषाणूचा आरएनए एक यूनीक इम्यून सेल तयार करतो, ज्या कॅन्सरशी लढू शकतात. या सेल नंतर ट्यूमरच्या आत असलेल्या कॅन्सरच्या सेल नष्ट करु शकतात. डॉक्टरांना ही माहिती खूप उपयुक्त वाटत आहे, कारण त्यातून इम्यून सेल्स निर्माण करणारे उपचार तयार केले जाऊ शकतात. डॉक्टर अंकित यांनी सांगितले की, मेलेनोमा, फुफ्फुस, स्तन आणि कोलन कॅन्सरच्या उपचारात मदत होऊ शकते. डॉक्टरांनी पुढे सांगितले की, 'हे खूप सकारात्मक आणि चकित करायला लावणारे आहे की, ज्या संसर्गामुळे एवढा विनाश झाला तो कॅन्सरशी लढायला मदत करु शकतो.'

औषध बनवता येते

डॉक्टरांनी सांगितले की, यापासून एक औषध तयार केले जाऊ शकते जे अॅडव्हान्स कॅन्सरवर मदत करेल. डॉक्टर भरत यांनी स्पष्ट केले की, कॅन्सच्या सेल्स या इम्यून सेल्सना प्रतिकार करु शकल्या नहीत. हे त्या रुग्णांना उपयुक्त ठरेल जे इम्युनोथेरपीचा प्रतिकार करतात. या प्रकरणांमध्ये, इम्युनोथेरपीनंतर कॅन्सर परत येतो कारण कॅन्सरच्या सेल्स स्वतःच म्यूटेट होतात. कोरोना व्हायरस नॅचरल किलर सेल्स तयार करतो, ज्या कॅन्सरच्या सेल्स मारण्यासाठी प्रभावी ठरतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'हा' बॉलिवूड अभिनेता बनणार 'कांतारा' फेम ऋषभ शेट्टीचा औरंगजेब! 2027 मधील सर्वात मोठ्या चित्रपटाची चर्चा

Goa Crime: भाडेकरुनेच केला मालकाचा आणि मित्राचा खून? दुहेरी हत्याकांडाने हादरले साळीगाव! पोलिसांकडून तपास सुरु

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

SCROLL FOR NEXT