Covaxin Vaccine  Dainik Gomantak
ग्लोबल

नव्या कोरोना व्हेरिएंटवर Covaxin प्रभावी- अमेरिकन अभ्यास

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant) देशात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे.

दैनिक गोमन्तक

भारतामध्ये कोरोनाची (Covid19) दुसरी लाट काहीशी ओसरत असताना दुसरीकडे मात्र कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे (Delta Plus Variant) देशात पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण निर्माण झाले आहे. या नव्या व्हेरिएंटमुळे देशामध्ये कोरोनाची तिसरी लाट येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दरम्यानच एक गूड न्यूज समोर आली आहे. भारतामध्ये विकसीत झालेल्या कोरोना लसीला अमेरिकेने (America) कोरोनाविरुध्द प्रभावी असल्याचे म्हटले आहे. भारत बायोटेकने (India Biotech) भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (ICMR) मदतीने बनवलेली कोव्हॅक्सिन लस (Covaxin Vaccine) डेल्टा (Delta) आणि अल्फा (Alpha) या दोन्ही व्हेरिएंटवर प्रभावी असल्याची माहिती अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ ने दिली आहे.

शरिरामध्ये कोव्हॅक्सिन लस प्रतिकारशक्ती तयार करते. या लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. तर यामध्ये शरिरामध्ये नवीन अँटीबॉडी आढळल्या आणि कोव्हॅक्सिन लस डेल्टा आणि अल्फा व्हेरिएंटवर अधिक प्रभावी असल्याचे सिध्द झाले आहे, असे अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थने (National Institutes of Health) म्हटले आहे.

कोव्हॅक्सिन लस 78 प्रभावी

शऱिरामध्ये कोव्हॅक्सिन लस वेगाने अँटीबॉडीज तयार करते. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील परिणामकारक लस म्हणून ही सुरक्षित आणि चांगली असल्याचे म्हटले जाते. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटवर ही लस 70 टक्के प्रभावी आहे. कोरोनाच्या B.1.617 (डेल्टा) B.1.17 (अल्फा) या व्हेरिएंटवर कोव्हॅक्सिन प्रभावीपणे काम करते, असे अमेरिकन अभ्यासातून स्पष्ट झाले आहे.

भारत बायोटेकन भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या मदतीने कोव्हॅक्सिन ही लस बनवली आहे. ब्रिटनमध्ये अल्फा B.1.1.7 व्हेरिएंट सर्वातआधी आढळला होता. तर भारतामध्ये डेल्टा B1.617 व्हेरिअंट सर्वात आगोदर आढळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT