Jinnah House Fire  Dainik Gomantak
ग्लोबल

Jinnah House Fire Video: जिना हाऊस जाळणाऱ्यावर 2 लाखांचे बक्षीस, इम्रान यांच्या समर्थकांचा...

Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी मोठा तांडव केला.

Manish Jadhav

Jinnah House Fire: पाकिस्तान सध्या भयंकर अशा आर्थिक आणि राजकीय संकटाचा सामना करत आहे. यातच, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेच्या निषेधार्थ त्यांच्या समर्थकांनी मोठा तांडव केला.

देशभरात झालेल्या हिंसाचारात कोट्यवधी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. यामध्ये एक जिना हाऊसही आहे, जे इम्रान यांच्या समर्थकांनी उद्ध्वस्त केले. लाहोरचे कॉर्पस कमांडर जनरल सलमान फयाज गनी जिना हाऊसमध्ये राहत होते.

दरम्यान, पाकिस्तानी कमांडर सलमान फयाजवर कोर्ट मार्शलची मागणी केली जात आहे. 9 मे रोजी जिना हाऊसला आग लागली होती.

यावेळी इम्रान यांच्या समर्थकांनी लुटमारही केली. विशेष म्हणजे, समर्थकांनी येथे ठेवलेल्या मौल्यवान वस्तूही पळवून नेल्या.

येथे जाळपोळ करणाऱ्या 340 संशयितांना अटक करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यूनिफॉर्म चोरुन तो परिधान करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे.

जिना हाऊस जाळणाऱ्यावर 2 लाखांचे बक्षीस

पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी कडक आदेश जारी केला. सर्व दोषींवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. पीएम शाहबाज यांनी 72 तासांत आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. जिना हाऊस जाळणाऱ्या मुख्य आरोपीवर 200,000 रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

तथापि, पीटीआय नेत्याने हिंसाचारानंतर व्हिडिओ जारी केला, ज्यामध्ये पोलिस अधिकारी इमारतीची तोडफोड करताना दिसत आहेत.

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पीटीआय नेत्याचा दावा आहे की, पोलिसांनी तोडफोड करताना कायद-ए-आझम यांची शेकडो छायाचित्रे नष्ट केली. या हल्ल्यात सहभागी असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी पीटीआय नेत्याने केली.

जिना हाऊस जाळणाऱ्यांवर कडक कारवाई

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हिडिओ रेकॉर्डिंग, सीसीटीव्ही फुटेज आणि इतर स्त्रोतांवरुन आरोपींची ओळख पटली आहे.

दुसरीकडे, पंजाब पोलिसांच्या विशेष शाखेने पोलिसांच्या (Police) वाहनांवर आणि खाजगी इमारतींवर हल्ले करणाऱ्या 62 जणांची ओळख पटवली. आरोपींविरुद्ध दहशतवादविरोधी कायदा आणि इतर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाहोरमध्ये आतापर्यंत तीन हजारांहून अधिक अटक

पंजाब पोलिसांनी प्रांतात आणखी 292 लोकांना अटक केली आहे. 9 मे पासून लाहोरमध्ये 3,186 लोकांना अटक करण्यात आली आहे.

गुप्तचर माहितीच्या आधारे हिंसाचाराचा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे. अहवालात असे सांगण्यात आले आहे की, संपूर्ण पंजाबमधील 742 व्हिडिओंचे विश्लेषण करण्यात आले, त्यापैकी 458 व्हिडिओ लाहोरमधील आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

SCROLL FOR NEXT