Court Grants Divorce Of Couple After 3 Months Of Marriage In Kuwait.  Dainik Gomantak
ग्लोबल

कोर्ट मॅरेज होताच 3 मिनिटांत मोडलं लग्न, न्यायमूर्तींनी लगेच दिला घटस्फोट

लग्नानंतर मुलीच्या घरच्यांच्या निरोपाची तयारी सुरू होती, मात्र काही मुद्द्यावरून वराने वधूची खिल्ली उडवली, जे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण ठरले.

Ashutosh Masgaunde

Court Grants Divorce Of Couple After 3 Months Of Marriage In Kuwait:

लग्न मंडपात 7 फेऱ्या झाल्या आणि 3 मिनिटांनंतर नवविवाहित जोडप्याचा घटस्फोटही झाला. परंतु यामागचे कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

खरंतर, लग्नानंतर मुलीच्या घरच्यांच्या निरोपाची तयारी सुरू होती, मात्र काही मुद्द्यावरून वराने वधूची खिल्ली उडवली, जे या दोघांच्या घटस्फोटाचे कारण ठरले.

लग्नाची कायदेशीर प्रक्रिया आटोपून वधू-वर कोर्टरूममधून बाहेर पडत होते. दोघीही वळताच अचानक नवरी घसरली. तिला पडताना पाहून वराने तिला मूर्ख म्हटले. यानंतर नववधूला राग आला आणि तिने तात्काळ न्यायाधीशांकडे जाऊन आपले लग्न रद्द करण्याची मागणी केली.

न्यायमूर्तींनीही लगेचच ३ मिनिटांपूर्वी झालेला विवाह रद्द ठरवला. असा दावा एका मीडिया हाउसने केला आहे.

हे प्रकरण कुवेतचे असल्याचे सांगण्यात येत आहे. कुवेतमधील हे सर्वात कमी काळ टिकलेले लग्न असल्याचे सांगण्यात येत आहे.

या लग्नाबाबत सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेक लोक वधूचे कौतुकही करत आहेत.

काही लोक म्हणत आहेत की ज्या लग्नात सुरुवातीला एकमेकांबद्दल आदर नाही, ते नाते तोडणे चांगले. जर कोणी आपल्या जोडीदारासोबत सुरुवातीलाच असा प्रकार करत असेल, तर अशा लग्नाला मान्यता देण्याची गरज नाही.

अशा परिस्थितीत अगदी सुरुवातीलाच नातं तोडणं अगदी योग्य आहे. असे असताना काही लोक वधूवर टीकाही करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: बेपत्ता राजवीर सापडला; काणका पर्रा येथे लागला शोध

Saint Xavier Exposition: मुंबईतील अमेरिकेच्या वाणिज्य दूताने घेतले संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवाचे दर्शन; गोव्याचे केले विशेष कौतुक

Cash For Job: संशयितांच्या मालमत्तेची चौकशी करा! पोलिसांची शिफारस; कोट्यवधींची अफ़रातफर उलगडणार?

Randeep Hooda At IFFI: बिरसा मुंडांच्या जीवनावर सिनेनिर्मिती व्हावी! अंदमान सेल्युलर तुरुंगात गेल्यानंतर मात्र.. ; रणदीप हुडाने मांडले स्पष्ट मत

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

SCROLL FOR NEXT