Army officer General Abdurrahman Tchiani Dainik Gomantak
ग्लोबल

Niger Army: नायजरमध्ये सत्तापालट करणाऱ्या जनरलची जगाला धमकी, अडीच कोटी लोक...

Niger Army: जगातील अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी पश्चिम आफ्रिकन देश नायजरमधील सत्तापालटाचा निषेध आणि विरोध केला आहे

Manish Jadhav

Niger Army: जगातील अनेक देश आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी पश्चिम आफ्रिकन देश नायजरमधील सत्तापालटाचा निषेध आणि विरोध केला आहे. नायजरच्या नव्या लष्करी शासकाने यावर आता आपली प्रतिक्रिया दिली.

टीव्हीच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर केलेल्या भाषणात लष्करी शासकाने शेजारी देश आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला धमकी दिली आहे. यासोबतच त्याने आपल्या भाषणात नायजरच्या जनतेला देशाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

मात्र, या धमकीनंतर नायजर संकटात सापडला आहे. नायजरचा 90 टक्के वीजपुरवठा शेजारच्या नायजेरियातून होतो, जो आता ECOWAS ने जाहीर केलेल्या निर्बंधांनुसार अवरोधित आहे. हा पुरवठा बंद झाल्यामुळे नायजरच्या अडीच कोटींहून अधिक लोकसंख्येला (Population) अंधारात जीवन जगण्याचा धोका निर्माण झाला आहे.

दरम्यान, इकॉनॉमिक कम्युनिटी ऑफ वेस्ट आफ्रिकन स्टेट्स अर्थात ECOWAS ने आपल्या बैठकीत नायजरमधील सत्तापालटानंतर अनेक निर्बंध लादले आहेत.

वृत्तानुसार, मंगळवारी नायजेरियाहून (Nigeria) नायजरला होणारा वीजपुरवठा खंडित करण्यात आला. दुसरीकडे, नायजरच्या वर्तमान सत्ताधारी लष्करी शासकाने आपल्या भाषणात नायजरच्या लोकांना देशाचे रक्षण करण्याचे आवाहन केले.

लष्करी जनरल अब्दुररहमान त्चियानी यांनी सांगितले की, 'सर्वांनी एकत्र येऊन नायजरच्या लोकांवर अत्याचार करणाऱ्या आणि देशाला अस्थिर करणाऱ्यांचा बिमोड केला पाहिजे.'

सध्या नायजर सैन्याचे नेतृत्व करत असलेल्या जनरल त्चियानी यांनी पुढे सांगितले की, 'ते देशात शांततापूर्ण बदल घडवून आणतील.' त्चियानी यांचे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा इकोवास संघटनेने अटकेत असलेल्या राष्ट्रपतींना सोडण्याबाबत धमकी दिली.

राष्ट्रपतींना सोडले नाही तर देशात सर्व प्रकारचे आर्थिक निर्बंध लादले जातील, असे संघटनेने म्हटले आहे.

पाश्चात्य देशांनी विरोध केला

नायजरमधील सत्तापालटाला पाश्चात्य देशांनी कडाडून विरोध केला आहे. सुमारे 1500 फ्रेंच सैनिक नायजरसह संयुक्तपणे अभियान राबवते.

याशिवाय, नायजरच्या सैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी अमेरिका आणि इतर युरोपीय देशांनी मदत केली आहे. मात्र, ECOWAS ने लादलेल्या निर्बंधानंतर देशाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. नायजरच्या सैन्याने याला बेकायदेशीर, अन्यायकारक, अमानवीय म्हटले आहे.

नायजरचा वीजपुरवठा खंडित झाला

सत्तापालटानंतर ECOWAS ने कठोर भूमिका घेत नायजरवर विविध निर्बंध लादले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, शेजारच्या नायजेरियाच्या एका मुख्य वीज कंपनीने मंगळवारी नायजेरियातून नायजरला होणारा वीजपुरवठा खंडित केला.

त्याचवेळी, अनेक देशांनी आपल्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अनेक फ्लाइट्स पाठवल्या आहेत. फ्रान्स आणि अमेरिकेने नायजरमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना विमानांद्वारे सुरक्षित स्थळी नेले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

Rashi Bhavishya 04 July 2025: प्रवासाचे योग, सामाजिक मान मिळेल; महत्वाची व्यक्ती भेटेल

Acid Attack Goa: 'त्याच्या' आईनेच आत्महत्येस प्रवृत्त केलं... अ‍ॅसिड हल्ल्याप्रकरणी मृत मुलीच्या आईचा खळबळजनक आरोप

SCROLL FOR NEXT