Mosques Dainik Gomantak
ग्लोबल

Restrictions In Building Mosques: या देशांमध्ये मुस्लिम राहतात, पण मशीद बांधायला परवानगी नाही!

Countries That Don't Have Mosque: इस्लाम हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. 2022 च्या अंदाजानुसार, जगातील 25 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे.

दैनिक गोमन्तक

Muslim Population In World: इस्लाम हा जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे. 2022 च्या अंदाजानुसार, जगातील 25 टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. सुमारे 1.97 अब्ज लोक इस्लामला मानतात. पण जगात असे दोन देश आहेत, जिथे मुस्लिम लोक राहतात, पण त्यांना मशीद बांधायला परवानगी नाही. या देशांमध्ये राहणारे मुस्लिम लोक वर्षानुवर्षे मशीद बांधण्याची मागणी करत आहेत, पण सरकारच त्याला परवानगी देत ​​नाही. विशेष म्हणजे, हे दोन्ही देश नवीन आहेत. इथे मुस्लिमांची लोकसंख्याही कमी आहे. ते सांस्कृतिक केंद्र किंवा फ्लॅटमध्ये नमाज अदा करतात.

दरम्यान, हे देश म्हणजे स्लोव्हाकिया, जो चेकोस्लोव्हाकियापासून वेगळा होऊन निर्माण झाला, तर दुसरा देश म्हणजे एस्टोनिया (Estonia). प्रथम एस्टोनियाबद्दल बोलूया. 2011 च्या जनगणनेनुसार इथे एकूण 1508 मुस्लिम राहतात. हे तिथल्या लोकसंख्येच्या 0.14 टक्के आहेत. परंतु आतापर्यंत ही लोकसंख्या वाढलेली असावी. पण संख्या खूपच कमी आहे.

या देशांमध्ये एकही मशीद नाही

एस्टोनियामध्ये एकही मशीद नाही. इथे एक इस्लामिक केंद्र आहे, जिथे मुस्लिम लोक जमतात आणि नमाज अदा करतात. अझेरी आणि सुन्नी तातार मुस्लिम या देशाचे रहिवासी आहेत. ते एकेकाळी रशियन सैन्यात होते. इथे सुन्नी आणि शिया समुदायाचे लोक एकत्र नमाज अदा करतात. ते एका फ्लॅटमध्ये जमा होतात. येथील मुस्लिम हे संयत मानले जातात. तर 1940 च्या सुमारास एस्टोनियाचे सोव्हिएत युनियनमध्ये विलीनीकरण झाले होते. परंतु 1991 मध्ये जेव्हा सोव्हिएत युनियनचे विघटन झाले तेव्हा त्याने स्वतःला स्वतंत्र देश म्हणून घोषित केले. आता तो युरोपियन युनियनचा सदस्य असून त्याची गणना समृद्ध देशांमध्ये होते.

मुस्लिम निर्वासितांना परवानगी नव्हती

2015 मध्ये, जेव्हा स्लोव्हाकियामध्ये 200 ख्रिश्चनांना आश्रय मिळाला तेव्हा युरोपसमोर निर्वासितांचे स्थलांतर हा एक मोठा प्रश्न होता. मात्र या देशाने मुस्लिमांना आश्रय देण्यास नकार दिला होता. त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाने इथे मुस्लिमांसाठी (Muslim) इबादतघर नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना आश्रय दिल्याने अडचणी निर्माण होऊ शकतात. 2016 मध्ये स्लोव्हाकियाने एक कायदा केला होता, ज्यामध्ये म्हटले होते की, या देशात इस्लामला धर्म म्हणून कधीही स्वीकारले जाणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkani Schools: ‘देवनागरी कोकणी’च्या शाळा सुरू करण्यास हरकत नाही! आमदारांनी पुढाकार घ्‍यावा, CM सावंत यांचे आवाहन

Goa Assembly Session: टॅक्सी व्यवसाय नींज गोयंकर यांच्या हातात राहिला पाहिजे

Goa Panchayat: पंचायत कर्मचाऱ्यांना 7वा वेतन आयोग, गुदिन्होंनी दिली माहिती; रेकॉर्ड पेपरलेस करण्याचा होणार प्रयत्न

विमान धावपट्टीवर पोहोचताच तांत्रिक बिघाड, प्रवाशांना उतरवून केली पुन्हा तपासणी; 'फ्लाय-91'मध्ये गोवा-पुणे प्रवाशांची गैरसोय

International Tiger Day: 2022 मध्ये गोव्यात 6 वाघ दिसले, पुढे काय..?

SCROLL FOR NEXT