Coronavirus causes havoc in Shanghai China, China Corona News Updates Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमधील शांघाय शहरात कोरोनाचा हाहाकार

बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, शांघायमध्ये 19,660 प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दैनिक गोमन्तक

लॉकडाऊन आणि टेस्टिंग सुरू असूनही चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये विक्रमी वाढ होत आहे. शांघाय या चीनमधील सर्वाधिक लोकसंख्येच्या शहरामध्ये परिस्थिती चिंताजनक आहे. तेथे गेल्या अनेक दिवसांपासून रोज सातत्याने 20 हजारांच्या आसपास रुग्ण समोर येत आहेत. (Coronavirus causes havoc in Shanghai China)

बुधवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, शांघायमध्ये 19,660 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. शांघायमध्ये वेगाने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. शांघायमधील रुग्णालयांमध्ये (Hospital) एक हजाराहून अधिक लष्करी डॉक्टरांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. चीनने ही रणनीती 2019 मध्ये वुहानसाठीही वापरली होती. 1 मार्चपासून शांघायमध्ये कोरोनाचे एकूण 114,000 रुग्ण आढळले आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आतापर्यंत चीन सरकारकडून शांघायमध्ये तीन वेळा सामूहिक चाचणी करण्यात आली आहे. कोरोनाची (Coronavirus) साखळी तोडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. (China Corona News Updates)

दरम्यान, शांघायमध्ये कडक लॉकडाऊन (Lockdown) लागू करण्यात आला आहे, त्यामुळे अन्न पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. सरकार लोकांना भाजी, मांस, तांदूळाचा पुरवठा करत आहे, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र, अनेक लोक मदत मिळत नसल्याचे संगत आहेत. बाधित लोकांना त्यांच्या इच्छेविरुद्ध 'क्वारंटाईन सेंटर'मध्ये पाठवले जात असल्याचेही वृत्त आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT