Corona virus Did it spread from Wuhan's lab Doubts again from all over the world including the United States  
ग्लोबल

corona virus : वुहानच्या लॅबमधूनच पसरला का ? जगभरातून पुन्हा शंका व्यक्त

दैनिक गोमंतक

नवी दिल्ली : जगात आज कोरोना विषाणूचा (Corona Virus) फैलाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. आतापर्यंत साडेतीन लाखाहून अधिक लोक यामध्ये मरण पावले आहेत. या विषाणूने 180 पेक्षा जास्त देशांमधील 16.8 दशलक्षाहून अधिक लोकांना संक्रमित केले आहे. परंतु कोरोना विषाणूशी संबंधित एक प्रश्न अजूनही अनुउत्तरीतच आहे. तो म्हणजे इतका भयानक आणि जिवघेणा कोरोना विषाणू आला कोठून ? कोरोना विषाणू हा चीनमधील वुहानच्या लॅबमधूनच (Lab) पसरला असल्याची शंका अमेरिकेसह सर्व जगातून पुन्हा एकदा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना (WHO) ही पुन्हा एकदा जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूच्या चौकशीसाठी वुहानच्या लॅबची तपासणी करण्याची शक्यता आहे. डब्लूएचओचे महासंचालक टेड्रोस अधनोम घेब्रेयेसस या विषाणूच्या पुढील अभ्यास करण्यावर सहमची दर्शविली आहे. 

अमेरिकेतून (America) या विषाणूबाबचा नवीन अहवाल समोर आल्यानंतर कोरोना विषाणूच्या उत्पतीबाबत स्वतंत्र तपासणी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. चीनचे (China) काही संशोधक 30 डिसेंबर 2019 ला कोरोनामुळे आजारी पडल्याचे समोर आले आहे. परंतु चीनने याचा नकार दिला आहे. 

वुहानच्या लॅबमधून कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबतच्या बातमीवर चीनची बोलची मात्र बंद झाली आहे. वुहान व्हायरलॉजी इन्स्टिट्यूटकडून कोरोना विषाणूबाबत स्वतंत्र चौकशी करण्याची परवानगी देण्यात येणार का, या प्रश्नाला मात्र चीन कडून बगल देण्यात आली आहे. चीनमधील संशोधकांनी असा दावा केला आहे की, कोरोना विषाणूचे संक्रमण पैंगोलिन (सरड्याचा एक प्रकार) असून त्यातून तो माणसामध्ये गेला आहे. असे सांगत चीन याबाबत कोणतेही सहकार्य करताना दिसत नाही. 

तपासाच्या मागणीवरील प्रश्नांना उत्तर देताना चिनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञ गटाने कोरोना विषाणूच्या उत्पत्तीबाबत केलेल्या अभ्यासाचा दाखला दिला आहे. परंतु कोरोना विषाणू वुहानच्या लॅबमधून आला आहे, हा आरोपा चीनला मान्य आहे का? या प्रश्नाला मात्र झा ओ यांनी बगल दिली आहे. 

अमेरिकेला कोरोना विषाणूच्या उत्पत्तीची तपासणी सुरू ठेवण्याची इच्छा आहे. हा विषाणू जगात कोठून पसरला याची माहिती जगाला मिळणे आवश्यक आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडेन या 90 दिवसांच्या आत लॅब लीकबाबत रिपोर्ट देण्याचे आदेश दिले आहेत. बायडेन यांचे असे म्हणणे आहे की, हा विषाणू कोणत्याही प्राण्याच्या संपर्कातून मानवाच्या शरिरात गेल्याचे किंवा प्रयोगशाळेत झालेल्या अपघातामुळे आल्याचे असे अद्याप कोणतेही निष्कर्ष काढण्यास ठोस पुरावे नाहीत. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahul Gandhi: 'गोव्यात भाजप सांप्रदायिक तणाव निर्माण करतंय'; राहुल गांधींचा हल्लाबोल

St. Francis Xavier DNA Test Row: वेलिंगकरांविरोधात रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांची माघार! राजकीय मायलेजचा मुद्दा नडला

Leopard Trapped at Pissurlem: ..अखेर बिबट्या जेरबंद! पिसुर्ले ग्रामस्थांनी सोडला सुटकेचा नि:श्वास

CM Pramod Sawant: पोल्ट्री उद्योगातून 'स्वयंपूर्ण गोवा' करण्यासाठी सरकार करणार मदत

Viral Video : ‘तो’ व्हिडिओ गोव्याचा नव्हे, कांगोचा

SCROLL FOR NEXT