COVID-19  Dainik Gomantak
ग्लोबल

चीनसह अनेक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव

चीनमधील शांघाय हे कोरोनाचे 'हॉटस्पॉट' बनले आहे.

दैनिक गोमन्तक

कोरोना महामारीमुळे जगभरातील अनेक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अलीकडच्या काही दिवसांत युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णांमद्धे पुन्हा वाढ होताना दिसत आहे. चीनच्या शांघायमध्ये कोरोनाने हाहाकार माजवला आहे. (Corona is spreading to many countries, including China)

चीन सरकारने लोकांवर अनेक निर्बंध लादले आहेत. येथे लॉकडाऊनमुळे कोट्यवधी लोकांना त्यांच्या घरात कैद राहावे लागत आहे. दुसरीकडे, शनिवारी इटलीमध्ये 70,520 नवीन कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. फ्रान्समध्येही कोविड-19 संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. भारतातही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना (Coronavirus) विषाणू संसर्गाची 2,527 नवीन प्रकरणे समोर आली आहेत. अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर पुन्हा निर्बंध लादण्यात आले आहेत.

चीनमधील शांघायमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढला आहे. शांघाय हे कोरोनाचे 'हॉटस्पॉट' बनले आहे. शहरातील बहुतांश कामे ठप्प झाली आहेत. सुमारे 2.5 कोटी लोकांना त्यांच्या घरात कैद राहावे लागत आहे. चीनच्या जिलिन प्रांतासह इतर अनेक शहरांमध्ये कोविड-19 चा झपाट्याने प्रसार सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT