António Guterres Dainik Gomantak
ग्लोबल

'सर्व धर्मांचा आदर', भाजप नेत्याच्या वादग्रस्त वक्तव्यावरील वाद आता UN मध्ये

भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक मुस्लिम देशांकडून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. अश्यातच आता युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांचे मत आले आहे.

दैनिक गोमन्तक

भाजप नेत्यांनी पैगंबर मोहम्मद (Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक मुस्लिम देशांकडून तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. अश्यातच आता युएनचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस (António Guterres) यांचे मत आले आहे. (The controversy over the statement of Prophet Muhammad has reached the United Nations)

एका पाकिस्तानी पत्रकाराने भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) आणि पक्षाच्या दिल्ली युनिटचे मीडिया प्रमुख नवीन कुमार जिंदाल ( Naveen Kumar Jindal) यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीचा मुद्दा उचलून धरला आहे. त्यांनी अनेक मुस्लिम देशांकडून झालेल्या निंदाबद्दल यूएन महासचिवांच्या प्रतिक्रियेबद्दल विचारले, ज्यावर त्यांचे प्रवक्ते स्टीफन दुजारिक यांनी हे विधान केले आहे.

सर्व धर्मांचा आदर मला आहे: संयुक्त राष्ट्राचे प्रवक्ते

पुढे दुजारिक म्हणाले की, मी यासंबंधीच्या सर्व बातम्या पाहिल्या आहेत. सर्वांनी केलेल्या टिप्पण्या देखील मी पाहिल्या आहेत. मी तुम्हाला सांगू शकतो की आम्ही सर्व धर्मांचा आदर आणि सहिष्णुता दृढपणे प्रोत्साहित करत असतो. अनेक मुस्लिम देशांनी प्रेषित मुहम्मद यांच्या विरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला विरोध केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, भाजपने रविवारी शर्मा यांना निलंबित करून जिंदाल यांची हकालपट्टी केली आहे.

यापूर्वी कतार, इराण आणि कुवेतने पैगंबर मोहम्मद यांच्याबद्दल भाजप नेत्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून रविवारी भारतीय राजदूतांना बोलावण्यात आले होते. आखाती क्षेत्रातील महत्त्वाच्या देशांनी या टिप्पण्यांचा निषेध केला आणि तीव्र आक्षेप देखील नोंदवला आहे.

या वक्तव्यावर मुस्लिम समुदायाच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, भाजपने दोन्ही नेत्यांच्या विधानांना एक प्रकारे झुगारून दिले आणि म्हटले की ते सर्व धर्मांचा आदर करतात, तसेच कोणत्याही धर्माच्या आदरणीय लोकांचा अपमान झालेला स्वीकारत नाही.

कतार आणि कुवेतमधील भारतीय दूतावासाच्या प्रवक्त्याने रविवारी सांगितले की, राजदूतांनी स्पष्ट केले आहे की ट्विट कोणत्याही प्रकारे भारत सरकारच्या विचार दर्शवत नाहीत. हे संकुचित विचारसरणीच्या तत्वांचे विचार आहेत.

इंडोनेशिया, सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिराती (यूएई), बहरीन आणि अफगाणिस्तान देखील सोमवारी मुस्लिम देशांमध्ये सामील झाले ज्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आणि सर्व धार्मिक विश्वासांचा आदर करण्याच्या महत्त्वावर भर दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA 4th T20: 'तीन पोती गहू विकून आलो होतो...', भारत-दक्षिण आफ्रिका सामना रद्द झाल्याने चाहत्याचा टाहो; BCCI वर टीकेची झोड

Viral Video: ब्रेकअप झालं अन् तिनं चक्क Chat GPT सोबत केलं लग्न; AI पार्टनरच्या प्रेमात बुडाली जपानी तरुणी Watch

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

SCROLL FOR NEXT