Congo Floods Dainik Gomantak
ग्लोबल

Congo Floods: पावसानंतर आलेल्या पुराने काँगोमध्ये 175 हून अधिक जणांचा मृत्यू, शेकडो बेपत्ता

Congo Floods: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आलेल्या पुरामुळे 175 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर बरेच लोक अद्याप बेपत्ता आहेत.

Manish Jadhav

Congo Floods: डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये आलेल्या पुरामुळे 175 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर बरेच लोक अद्याप बेपत्ता आहेत. वृत्तानुसार, पुरामुळे इमारतींचेही मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये शाळा आणि रुग्णालयांचाही समावेश आहे.

दरम्यान, दक्षिण किवू प्रांतातील कालेहे भागात गुरुवारी मुसळधार पाऊस झाला, त्यानंतर तेथील नद्यांना पूर आला. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे (Rain) बुशूशू आणि न्यामुकुबी गावे जलमय झाली. दक्षिण किवूचे गव्हर्नर थिओ नवाबिदझे कासी यांच्या म्हणण्यानुसार, सुमारे 200 लोक मारले गेले असून तेवढेच लोक बेपत्ता आहेत.

मृतदेहांचा ढीग

वृत्तानुसार, पुराचे पाणी ओसरल्यानंतर सर्वत्र मृतदेह आढळले. राज्यपालांच्या म्हणण्यानुसार, पुरामुळ घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. पिण्याचे पाणी आणि वीज पुरवठ्यावरही परिणाम झाला आहे. मृतांचा आकडा वाढू शकतो, असेही ते म्हणाले.

यापूर्वी, ऑक्टोबर 2014 मध्ये काँगोमध्ये (Congo) अशा प्रकारचा विध्वंस झाला होता. त्यावेळी 700 हून अधिक घरांना पुराचा फटका बसला होता. तसेच, 130 हून अधिक लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळाली होती. रवांडामध्ये गेल्या आठवड्यातही पावसाने कहर केला होता. तिथे पुराच्या तडाख्यात 130 लोकांचा मृत्यू झाला होता, तर 5,000 हून अधिक घरे उद्ध्वस्त झाली होती.

आफ्रिकन देश काँगोबद्दल जाणून घ्या

काँगो हा आफ्रिका खंडातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. या देशाची लोकसंख्या 9.59 कोटी आहे. काँगोचे पूर्ण नाव 'डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो' आहे. काँगोची सीमा अटलांटिक महासागराला स्पर्श करते. काँगोमध्ये सैन्य आणि अतिरेकी यांच्यात सुमारे 20 वर्षांपासून संघर्ष सुरु आहे. हा देश महिलांसाठी जगातील सर्वात धोकादायक मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT