Congo मध्ये दोन भारतीय जवान शहीद; परराष्ट्र मंत्रालयाने व्यक्त केला शोक

Congo News: पूर्व काँगोच्या बुटेम्बो शहरात मंगळवारी संयुक्त राष्ट्रविरोधी निदर्शनांमध्ये दोन भारतीय सैनिकांसह तीन संयुक्त राष्ट्र शांती सैनिक ठार झाले.
Indian soldier
Indian soldierDainik Gomantak
Published on
Updated on

Congo BSF Soldiers: पूर्व काँगोच्या बुटेम्बो शहरात मंगळवारी संयुक्त राष्ट्रविरोधी निदर्शनांमध्ये दोन भारतीय सैनिकांसह तीन संयुक्त राष्ट्र शांती सैनिक ठार झाले. बुटेम्बोचे पोलिस प्रमुख पॉल न्गोमा यांनी सांगितले की, 'हिंसाचारात सात आंदोलकांचाही मृत्यू झाला आहे. या भागात सोमवारी निदर्शने सुरु झाली. मोनुस्को (United Nations Peacekeeping Force) सशस्त्र अतिरेकी गटांविरुद्ध कारवाई करण्यात अयशस्वी ठरल्याचा आंदोलकांचा आरोप आहे.'

दरम्याम, या घटनेबद्दल शोक व्यक्त करताना, भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर (S Jaishankar) म्हणाले की, "काँगोमध्ये बीएसएफच्या दोन शूर भारतीय शांती सैनिकांच्या मृत्यूमुळे मला खूप दुःख झाले आहे." ते पुढे म्हणाले की, 'ते मोनुस्को (United Nations Peacekeeping Force) चा एक भाग होते.'

Indian soldier
Congo: UN च्या कार्यालयावर सशस्त्र गटांचा हल्ला, भारतीय जवानांची मोठी कारवाई

दुसरीकडे, कांगोच्या (Congo) पूर्वेकडील गोमा शहरात संयुक्त राष्ट्र (United Nations) मिशनच्या विरोधात निदर्शनांचा हा दुसरा दिवस आहे, असे एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले. निदर्शकांनी सोमवारी गोमा येथील यूएन मिशनच्या कार्यालयांना आग लावली आणि जबरदस्तीने आत जाण्याचा प्रयत्न केला. काँगोच्या पूर्वेकडील भागात वाढलेल्या हिंसाचाराच्या दरम्यान शांततारक्षक दल नागरिकांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. ते अनेक वर्षांपासून काँगोमधील संयुक्त राष्ट्रांच्या सैन्याला देश सोडण्यास सांगत आहेत.

Indian soldier
Sri Lanka: PM मोदींनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतींना पाठवले पत्र, 'एकत्र काम करण्यास उत्सुक'

शिवाय, सरकारचे प्रवक्ते पॅट्रिक मुय्या यांनी एका ट्विटमध्ये UN कर्मचारी आणि कार्यालयांवर झालेल्या हल्ल्यांचा निषेध करत म्हटले की, "5 लोक मारले गेले तर जवळपास 50 जण जखमी झाले आहेत." शांती दूतांच्या मृत्यूसाठी आंदोलकांनी त्यांच्यावर आरोप केले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com