7.4 magnitude Colombia earthquake causes building collapses and widespread destruction Dainik Gomantak
ग्लोबल

Colombia Earthquake VIDEO: जमीन फाटली अन् इमारती कोसळल्या, डोळ्यांदेखत उडाली दाणादाण! कोलंबियातील भीषण भूकंपात 132 मृत्यू, 1500 हून अधिक घरे उद्ध्वस्त

Colombia Earthquake 2026 Magnitude 7.4: दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाला 7.4 रिश्टर स्केलच्या एका अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी भूकंपाने हादरवून सोडले.

Manish Jadhav

Colombia Earthquake 2026 Magnitude 7.4: दक्षिण अमेरिकेतील कोलंबिया देशाला 7.4 रिश्टर स्केलच्या एका अत्यंत शक्तिशाली आणि विनाशकारी भूकंपाने हादरवून सोडले. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 132 जणांचा मृत्यू झाला असून 570 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. भूकंपाचे धक्के एवढे तीव्र होते की, जवळपास 1575 घरांचे मोठे नुकसान झाले असून डझनावारी घरे पत्त्यांसारखी कोलमडली.

याशिवाय 61 मोठ्या इमारती जमीनदोस्त झाल्या असून शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पश्चिम कोलंबियाच्या बाधित भागात युद्धपातळीवर शोध आणि बचाव मोहीम राबवली जात आहे.

भूकंप (Earthquake) होऊन एक दिवस उलटल्यानंतर मदतकार्याला अधिक वेग आला. कॅली, क्विब्डो आणि पेरेइरा या सर्वाधिक प्रभावित शहरांमध्ये बचाव पथके ढिगाऱ्याखाली जिवंत राहिलेल्या लोकांचा शोध घेत आहेत. या आपत्तीत एकट्या पेरेइरा शहरात सर्वाधिक 60 लोकांचा मृत्यू झाला असून अनेक कुटुंबे आपल्या बेपत्ता नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी स्वतः ढिगारे उपसत आहेत. तर दुसरीकडे, नागरिकांनी ऑनलाइन प्लॅटफॉर्म तयार करुन बेपत्ता लोकांची माहिती शेअर करण्यास सुरुवात केली आहे.

या बिकट परिस्थितीत लहान मुलांच्या सुरक्षेला प्राधान्य दिले जात असून, ज्या मुलांचे पालक बेपत्ता आहेत किंवा दगावले आहेत त्यांच्यासाठी 'वर्ल्ड व्हिजन कोलंबिया' सारख्या संस्था सुरक्षित आश्रयस्थान तयार करत आहेत.

या भूकंपाचा केंद्रबिंदू असलेला 'चोको' हा प्रांत कोलंबियामधील अत्यंत गरीब, दुर्गम आणि उपेक्षित भाग मानला जातो. हा परिसर घनदाट जंगलांनी वेढलेला असून, अनेक ठिकाणी केवळ बोट किंवा विमानानेच पोहोचणे शक्य आहे. या कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे बाधित लोकांपर्यंत वेळेत मदत पोहोचवणे बचाव पथकांसमोर मोठे आव्हान ठरत आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून कोलंबियाचे अध्यक्ष अबेलार्डो डी ला एस्प्रीएला यांनी चोको प्रांताची राजधानी क्विब्डो येथे पोहोचून नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेतला आणि प्रशासनाला जलद गतीने काम करण्याचे आदेश दिले. चालू वर्षातील (2026) जगातील हा सर्वात भीषण भूकंप मानला जात असून, याआधी व्हेनेझुएलातही अशाच प्रकारच्या भूकंपाने मोठी वित्तहानी आणि जीवितहानी घडवून आणली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT