crime Dainik Gomantak
ग्लोबल

तैवानचा द्वेश करणाऱ्या चीनी प्रवाशाने चर्चमध्ये केला अंदाधुंद गोळीबार, एकाचा मृत्यू

गोळीबाराच्या वेळी चर्चमधील बहुतेक लोक मूळचे तैवानचे होते.

दैनिक गोमन्तक

अमेरिकेतील दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये रविवारी एका संशयिताने चर्चच्या मेजवानीत सहभागी झालेल्या लोकांवर गोळीबार केला, त्यात एकाचा मृत्यू झाला आणि पाच ज्येष्ठ नागरिक जखमी झाले. याप्रकरणी एका परदेशी चिनी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा चिनी नागरिक तैवानचा द्वेष करतो आणि म्हणूनच त्याने हा हल्ला केला.

"कॅलिफोर्नियाच्या चर्चवर प्राणघातक हल्ला करणारा बंदूकधारी चिनी प्रवासी असून त्याने तैवानच्या लोकांबद्दल असलेल्या द्वेषातून हल्ला केला, पोलिसांनी असाधारण शौर्य दाखवत हल्लेखोराला पकडले," असे अधिकाऱ्यांनी आणि चर्चमध्ये उपस्थित लोकांना सांगितले.

ऑरेंज काउंटी शेरीफ विभागाने ट्विट केले की, लास वेगास येथील 68 वर्षीय डेव्हिड चौ (David Chou), यांच्यावर खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंडरशेरीफ जेफ हॅलॉकच्या म्हणण्यानुसार, संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून घटनास्थळावरून दोन हँडगन जप्त करण्यात आल्या आहेत.

शेरीफच्या प्रवक्त्या कॅरी ब्रॉन यांनी सांगितले की, गोळीबाराच्या वेळी चर्चमधील बहुतेक लोक मूळचे तैवानचे होते. त्यांनी सांगितले की संशयिताने सकाळच्या प्रार्थना सभेनंतर चर्चच्या मेजवानीला उपस्थित असलेल्या इर्विन तैवानी प्रेस्बिटेरियन चर्चच्या 30 ते 40 सदस्यांवर गोळीबार केला. पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच तेथे उपस्थित लोकांनी हल्लेखोराला पकडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा आग दुर्घटना! नाईटक्लब मालक लुथरा बंधुंचा जेलमधील मुक्काम वाढला, पोलिस कोठडीत चार दिवस वाढ

Mumbai Goa Highway: मुंबई गोवा महामार्ग हाऊसफुल! 31 डिसेंबरसाठी पर्यटक पडले बाहेर; गोवा-कोकणाकडे वळली पावले

"मला जो गोवा आवडतो, तसा तो राहिला नाही"! सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत; स्थानिक म्हणाला, 'आम्ही रोज या परिस्थितीला तोंड देतोय'

Minor girl Assault: नराधम बस चालकाचे घृणास्पद कृत्य! 6 वर्षीय चिमुरडीवर लैंगिक अत्याचार; आरोपी बक्षीला 4 दिवसांची पोलीस कोठडी

गोमंतकीय मातीतलं 'ख्रिस्तपुराण'! जेव्हा येशूची जन्मकथा ओवीबद्ध मराठीत अवतरली...

SCROLL FOR NEXT