Chinese Syp Balloon  Dainik Gomantak
ग्लोबल

Chinese Spy Balloon: अमेरिकेच्या आकाशात चीनचा स्पाय बलून; हेरगिरीचा पेंटॅगॉनचा आरोप

अमेरिकेत खळबळ, चीनसोबतच्या तणावात वाढ

Akshay Nirmale

Chinese Spy Balloon: गेल्या अनेक दिवसांपासून अमेरिकेच्या आकाशात एक संशयित चीनी स्पाय बलून दिसत असून, या फुग्याचा वापर हेरगिरीसाठी केला जात असल्याचा संशय अमेरिकेचा संरक्षण विभाग पेंटॅगॉनने व्यक्त केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकेच्या आकाशात चीनचा एक संशयित स्पाय बलून उडताना दिसत आहे. त्यात हेरगिरीची उपकरणे असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अमेरिकन सरकारमध्ये खळबळ उडाली आहे.

सुरुवातीला हा महाकाय फुगा खाली पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. पण गोळीबारानंतर पडलेल्या ढिगाऱ्यांमुळे सुरक्षेला धोका निर्माण होण्याचे धोके लक्षात घेऊन सरकारने मागे हटले.

काही वरिष्ठ यूएस अधिकाऱ्यांनी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना या फुग्याला खाली पाडणे टाळण्याचा सल्ला दिला कारण खाली पडणारा ढिगारा नष्ट झाल्यावर सुरक्षा परिस्थिती धोक्यात येऊ शकते.

अमेरिकेच्या एका वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्याने सांगितले की, या फुग्याचा वापर हेरगिरीसाठी होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तैवानच्या मुद्द्यावरून जगातील दोन सर्वात मोठ्या अर्थव्यवस्था असलेल्या चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध गेल्या वर्षी तणावपूर्ण राहिले आहेत.

तैवानमधील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि दक्षिण चीन समुद्रात चीनच्या लष्करी कारवायांचा अमेरिका निषेध करत आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिकन हवाई क्षेत्रात दिसणाऱ्या या बलूनचा अमेरिका मागोवा घेत आहे. अमेरिकन लष्करी विमानांद्वारेही त्यावर लक्ष ठेवले जात आहे. मात्र, हा फुगा कोणत्या उंचीवर उडत आहे, याबाबत काहीही बोलण्यास अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. पण हे नागरी हवाई वाहतुकीच्या हद्दीच्या वर उडत असल्याचे सांगितले आहे.

यूएस आर्मीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हा फुगा मोंटाना शहरावरून हा फुगा फोडण्याचा विचार केला होता, परंतु संभाव्य धोक्याची काहीच कल्पना नसल्यामुळे कृती केली गेली नाही.

अमेरिकन अधिकाऱ्यांनीही हा मुद्दा चीनसमोर मांडला आहे. या प्रकरणावर आम्ही चीनी समकक्षांशी गांभीर्याने चर्चा केली असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. अलिकडच्या वर्षांत अमेरिकेत अनेक वेळा स्पाय बलून दिसले आहेत. मात्र यावेळी हा संशयित चीनी स्पाय बलून बराच काळ अमेरिकन हवाई क्षेत्रात दिसत असल्याने चिंता वाढली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: तीन पोलिस निलंबित, तर दोघांवर शिस्तभंग; गोळीबार, एडबर्ग मारहाण प्रकरणी कारवाई

सीमा, स्विटी, सरस्वती, रश्मी.... ब्राझीलमधील मॉडेलचा फोटो वापरून 10 बूथवर 22 वेळा मतदान; राहुल गांधी यांचा नवा खुलासा

SPPU Rice Research: साध्या तांदळालाही 'बासमती'चा सुवास, जनुकीय बदलानंतर नवे वाण विकसित; 'एसपीपीयू'चे अनोखे संशोधन

Mapusa: 'पाकिस्तान झिंदाबाद', डिजिटल बोर्डमुळे गोंधळ; दोन आस्थापनांच्या 9 कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; हडफडे, कळंगुटमधील प्रकार

Goa Crime: डोंगर कापणी वादाचा बळी, जबर मारहाणीत ज्येष्ठाचा मृत्यू; मोरजीसह राज्यात खळबळ

SCROLL FOR NEXT