China's nuclear submarine trapped in its own net, major accident in the Yellow Sea, 55 sailors feared dead. Dainik Gomantak
ग्लोबल

Chinese Nuclear Submarine: ब्रिटनला फसवण्याचा नादात चीनने गमावले 55 सैनिक, पिवळ्या समुद्रात बुडाली आण्विक पाणबुडी

Chinese Nuclear Submarine: ब्रिटेनमधील वृत्तपत्र डेली मेलने याबाबत वृत्त दिले आहे. हा सर्व प्रकार २१ ऑगस्ट रोजी एका मिशन दरम्यान झाल्याचे ब्रिटनच्या एका सिक्रेट रिपोर्टद्वारे सांगण्यात आले आहे.

Ashutosh Masgaunde

China's nuclear submarine trapped in its own net, major accident in the Yellow Sea, 55 sailors feared dead:

चीनच्या एका अण्विक पाणबुडीचा पिवळ्या समुद्रात अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये चीनच्या पीपल्स लीबरेशन आर्मीचे जवळपास 55 नौसैनिक मृत्यूमुखी पडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रिटेनमधील वृत्तपत्र डेली मेलने याबाबत वृत्त दिले आहे. हा सर्व प्रकार २१ ऑगस्ट रोजी एका मिशन दरम्यान झाल्याचे ब्रिटनच्या एका सिक्रेट रिपोर्टद्वारे सांगण्यात आले आहे.

ब्रिटिश आण्विक पाणबुड्यांना फसवण्याच्या प्रयत्नात चीनी आण्विक पाणबुडीचा अपघात झाल्याची शक्यता अनेकांनी वर्तवली जात आहे. यापूर्वी चीनच्या पाणबूडीबद्दल अशी घटना घडली होती. पण आता या घटनेबद्दल चीनने मौन बाळगलेले पाहायला मिळत आहे.

या आण्विक पाणबूडीच्या अपघातात जवळपास ५५ नौसैनिक, २२ अधिकारी, ९ वरीष्ठ अधिकारी, १७ नौसेना कामगार, कॅप्टन कर्नल जू योंग पेंग होते. चीनची आण्विक पाणबूडी ०९३ ही गेल्या १५ वर्षापासून चीनच्या पीपल लिब्रेशन आर्मीच्या नौसेनेचा भाग आहे. या पाणबूडीची उंची ३५१ फुट लांब आहे. ही चीनच्या अत्याधुनिक पाणबुडीपैकी एक होती.

डेली मेलमध्ये दिलेल्या माहितीनुसार, पाणबुडीमध्ये झालेल्या हाइपोक्सिया बिघाडामुळे नौसैनिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे.

अमेरिका आणि सहयोगी पाणबूड्यांना अडकवण्यासाठी चीनी नौसैनेने वापरलेल्या चेन आणि एंकरमध्ये पाणबूडी अडकली. त्यानंतर सिस्टम खराब झाली आणि ते दुरुस्त करण्यास जवळपास सहा तास उलटले. ऑक्सिजन प्रणालीमध्ये बिघाड झाल्यामुळे जहाजावरील क्रूला विषबाधा झाली. आण्विक पाणबुडी बुडण्याची ही घटना चीनच्या शेडोंग प्रांतात घडल्याचे समजते.

आतापर्यंत चीनच्या नौसेनेकडून नुकसान झालेल्या घटनेबद्दल कोणत्याही प्रकारची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. ब्रिटनने दिलेल्या माहितीची सतत्या पाडताण्यासाठी रिपोर्टवर चर्चा करण्यास रॉयल नेवीला संपर्क केला पण त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

King Momo 2026: कार्निव्हल 2026 चे बिगुल वाजले! सेड्रिक डी कोस्टा यांची 'किंग मोमो' म्हणून घोषणा

IND vs NZ: विजेच्या वेगाने आला चेंडू अन्... श्रेयस अय्यरच्या 'रॉकेट थ्रो'ने उडवले स्टंप्स; ब्रेसवेलची डायव्हही ठरली अपयशी Watch Video

Viral Video: 'धूम' स्टाईल स्टंट अन् थेट जमिनीवर लोळण! दिल्ली पोलिसांचा रीलवाल्यांना दणका; स्टंटबाजांचं मीम बनवून केलं ट्रोल

IND vs NZ: किवी सलामीवीरांचा धमाका! 27 वर्षांनंतर भारतीय भूमीवर रचला ऐतिहासिक रेकॉर्ड; कॉन्वे आणि निकोल्स जोडीची कमाल

लग्नाला गेले कुटुंब अन् एकटी मुलगी, खिडकीचे ग्रिल कापताना चोरट्यांना रंगेहाथ पकडले; पर्रा येथे दरोड्याचा मोठा डाव फसला

SCROLL FOR NEXT