Xi jinping Dainik Gomantak
ग्लोबल

चीनची आर्थिक घौडदौड सुरुच, वर्षात 'ड्रॅगन' च्या निर्यातीत 25.6 टक्क्यांनी वाढ

दुसरीकडे मात्र गेल्या वर्षी जागतिक आर्थिक बंदी असताना अमेरिकेसह (America) अनेक देशांची आर्थिक दुरावस्था झाली.

दैनिक गोमन्तक

जग अजूनही कोरोनाचा (Coronavirus) सामना करत असल्याने अनेक देशांची आर्थिक स्थिती या काळात अधिक बिकटच झाली. मात्र चीनची (China) आर्थिक घौडदौड अधिक वेगाने सुरु आहे. चीनने डेल्टा व्हेरिएंटच्या (Delta Variant) वाढत्या प्रसारामुळे निर्माण झालेल्या अडथळ्याला न जुमानता ऑगस्टमध्ये आयात आणि निर्यातीच्या वाढीमध्ये कमालीची वृध्दी केली आहे. सीमाशुल्क आकडेवारी दर्शवते की, चीनची निर्यात एक वर्षापूर्वीच्या तुलनेत 25.6 टक्क्यांनी वाढून $ 294.3 अब्ज झाली आहे. जुलैच्या तुलनेत 18.9 टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, आयात मागील महिन्यात 28.7 टक्क्यांवरुन वाढून 33.1 टक्के झाली. आता हे वाढून $ 236 अब्ज झाली आहे. दुसरीकडे मात्र गेल्या वर्षी जागतिक आर्थिक बंदी असताना अमेरिकेसह (America) अनेक देशांची आर्थिक दुरावस्था झाली.

दरम्यान, चीनने आतापर्यंतचे सर्व अंदाज फेटाळून लावत सांगितले की, त्याच्या निर्यातीची मागणी कमी दाखवली आहे. वाढत्या मागणीमुळे गेल्या महिन्यात निर्यातीपेक्षा आयात खूप होती, असे कॅपिटल इकॉनॉमिक्सच्या शीना यू (Sheena U) यांनी एका अहवालात म्हटले आहे. तर डेटा मात्र आपूर्तीची कमतरता दर्शवितो. 2020 च्या तुलनेत यावर्षी व्यापारी आकडेवारीत बदल झाला आहे. कोरोनाशी लढण्यासाठी सरकारने कंपन्या आणि दुकाने बंद केली आहेत. त्यामुळे पहिल्या सहामाहीत जागतिक मागणी कमी झाली. त्याच वेळी, जेव्हा चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाने विषाणू नियंत्रणात आणल्याचे जाहीर केले आणि त्यानंतर मात्र चीनची निर्यात पुन्हा एकदा प्रचंड वेगाने सुरु झाली.

चीनवर अमेरिकी टैरिफ असूनही अमेरिकेबरोबर व्यापार वाढला

अमेरिकेची चीनची ऑगस्ट निर्यात 15.5 टक्क्यांनी वाढून 51.7 अब्ज डॉलर झाली आहे. जुलैच्या तुलनेत 13.4 टक्के वाढ झाली आहे. जेव्हा अमेरिकेने बीजिंगच्या तंत्रज्ञानाच्या महत्त्वाकांक्षांवर टैरिफ वाढवले होते, तेव्हा हे घडले. अमेरिकन वस्तूंची आयात मागील महिन्यात 25.5 टक्क्यांनी वाढून 33.3 टक्क्यांवर पोहोचली. ते आता 14 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापारी युद्धाकडे जगाची नजर होती. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात या टॅरिफमध्ये वाढ करण्यात आली होती.

बायडन यांनी आयात निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला नाही

त्याचवेळी, जानेवारीमध्ये राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलेल्या जो बायडन (Joe Biden) यांनी डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी चीनवर लादलेले आयात निर्बंध वाढवण्याबाबत अद्याप काहीही सांगितलेले नाही. या मुद्यावर दोन्ही देशांच्या राजदूतांनी व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. परंतु अद्याप दोन्ही देशांकडून चर्चेची तारीख जाहीर केलेली नाही. ऑगस्टमध्ये चीनचा जागतिक व्यापारी अधिशेष 1 टक्क्यांनी घसरुन 58.3 अब्ज डॉलरवर आला आहे. अमेरिकेसह राजकीयदृष्ट्या अस्थिर अधिशेष 10 टक्क्यांनी वाढून $ 37.7 अब्ज झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT