Xi jinping
Xi jinping Dainik Gomantak
ग्लोबल

चीन तालिबानला पूर्ण आर्थिक सहाय्य करणार: परराष्ट्र मंत्रालय

दैनिक गोमन्तक

तालिबानच्या (Taliban) ताब्यात असलेल्या अफगाणिस्तानला (Afghanistan) आर्थिक मदत देण्याचे चीनने सोमवारी सूचित केले. तालिबानने अफगाणिस्तावर सत्ता काबीज केल्यानंतर जगभरातील विविध देशांनी काबूलला आर्थिक मदत (Financial Assistance) देण्यास असहमती दर्शवली आहे. यातच आता युद्धग्रस्त देशाला मदत करण्यासाठी चीन "सकारात्मक भूमिका" बजावेल असे चीनने म्हटले आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते वांग वेनबिन यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत या गोष्टी सांगितल्या. अमेरिकेवर निशाणा साधत ते म्हणाले की, अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीस अमेरिका जबाबदार आहे. आणि यासंबंधी "मुख्य गुन्हेगार" ही आहे. अशा स्थितीत अफगाणिस्तानचं पुनर्निर्माण काही केल्याशिवाय सोडू शकत नाही.

अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे प्रमुखांनी म्हटले की, अमेरिकेची आर्थिक मदत थांबल्याने तालिबानचा मोर्चा चीन आणि पाकिस्तानकडे वळेल. या विधानाबद्दल विचारले असता, वेनबिन म्हणाले, "मला अगदी स्पष्टपणे सांगायचे आहे की अमेरिका हा मुख्य अपराधी आहे आणि अफगाणिस्तानच्या समस्येसाठी सर्वात मोठा बाह्य घटक आहे."

गेल्या आठवड्यात न्यूयॉर्क टाइम्सच्या एका अहवालात म्हटले आहे की, अफगाणिस्तानमधील मोहिमेच्या समाप्तीनंतरही अमेरिकेने अफगाणिस्तान सेंट्रल बँकेच्या कोट्यवधी डॉलर्सच्या पैशांवर नियंत्रण ठेवणे सुरु केले आहे. तालिबानने सत्ता हाती घेत शरिया कायदा लागू केला. तर आम्ही तालिबानला कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत देणार नाही, असेही जर्मनीने म्हटले आहे. युरोपियन युनियनच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, जोपर्यंत अधिकारी परिस्थितीबद्दल स्पष्टीकरण देत नाहीत तोपर्यंत अफगाणिस्तानला पैसे दिला जाणार नाहीत.

वेनबिन पुढे म्हणाले की "चीनने नेहमीच सर्व अफगाण लोकांसाठी मैत्रीपूर्ण धोरण स्वीकारले आहे" आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी अफगाणिस्तानला भरीव मदत देत आहे. 'आम्हाला आशा आहे की, देशातील अराजकता आणि युद्ध लवकरच संपेल. तो शक्य तितक्या लवकर आर्थिक व्यवस्था पुन्हा सुरू करण्यात येऊ शकते. शांतता, पुनर्बांधणी आणि लोकांच्या उपजीविकेची परिस्थिती सुधारण्यासाठी चीन अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी सकारात्मक भूमिका बजावेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Taleigao VP Election: 'पणजी कधीच सोडणार नाही', बाबूश यांचा विजयानंतर इशारा

Goa Today's Live News Update: धारगळ येथे उच्चदाब वीजवाहिनीला धक्का, सहा वीजखांब कोसळले

Russian In Goa: मद्यधुंद रशियन जोडप्याचा शिवोलीत राडा; पोलिसांसोबत हुज्जत, 108 ची मदत नाकारली

Loksabha Election 2024 : पंतप्रधान मोदींच्या यशासाठी मतदारांचे आशीर्वाद महत्त्‍वाचे : मुख्यमंत्री सावंत

Flood In Kenya: मुसळधार पावसामुळे केनियात 'हाहाकार', 42 जणांचा मृत्यू; अनेक जण बेपत्ता

SCROLL FOR NEXT