China Metro Viral Video Dainik Gomantak
ग्लोबल

Viral Video: मेट्रोतील 'या' व्हिडिओत नेमकं काय घडलं? चीनवर होतोय स्तुतीसुमनांचा वर्षाव; व्हायरल व्हिडिओ एकदा पाहाच

China Metro Viral Video: सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात चीनी तंत्रज्ञानाचा अद्भुत नजारा पाहून प्रत्येकजण थक्क होतो.

Manish Jadhav

China Metro Viral Video: चीन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात वेगाने प्रगती करत आहे. सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात, ज्यात चीनी तंत्रज्ञानाचा अद्भुत नजारा पाहून प्रत्येकजण थक्क होतो. दरम्यान, सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर धूमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ नैऋत्य चीनमधील चोंगकिंग येथून येणाऱ्या मेट्रोतील आहे. मेट्रोमध्ये लोकांना असे काहीतरी दिसले ज्यामुळे ते चीनवर स्तुतीसुमनांचा वर्षाव करत आहेत.

आधी तुम्ही हा व्हिडिओ पाहा

चीनी मुलीचा व्हिडिओ

दरम्यान, मेट्रो ट्रेनमधील खिडक्या काचेच्या बनवलेल्या असतात, परंतु चोंगकिंगमधील या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी मेट्रोच्या खिडकीवर बसवलेल्या स्मार्ट स्क्रीनवर प्रवाशांना रुट दाखवते. एवढचं नाहीतर सध्या मेट्रो कुठे आहे तेही दाखवते. स्क्रीनमध्ये ज्या पद्धतीने हाय पिक्सेलचा वापर करण्यात आला आहे त्यानेही लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. कारण, प्रत्येक गोष्ट अगदी स्पष्टपणे दिसत आहे. तुम्हाला मोबाईल स्क्रीन स्क्रोल करत असल्यासारखे वाटेल.

इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर @hwexplores नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. 2 फेब्रुवारी रोजी अपलोड झालेल्या या व्हिडिओने सोशल मीडियावर धूमाकूळ घातला आहे. बातमी लिहित असताना 74 हजार लोकांनी पोस्टला लाईक केले आहे, तर कमेंट सेक्शन चीनची प्रशंसा करणाऱ्या कमेंट्सनी भरलेले आहे.

एका यूजरने कमेंट केली की, अद्भुत! हे करण्यासाठी उत्तर अमेरिकेला 50 वर्षे लागतील. तर दुसऱ्याने लिहिले, चीन तंत्रज्ञानामध्ये खूप पुढे आहे. हे पाहून असे वाटते की, आपण अजूनही पाषाण युगात जगत आहोत. तिसऱ्याने लिहिले की, चीन प्रत्येक देशापेक्षा किमान 10 वर्षे पुढे जगत आहे. यावर एकाने उत्तरादाखल लिहिले की, 10 वर्षे पुढे नाही, 2050 मध्ये आहे म्हणा...

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT