चीनच्या (China) लिबरेशन पीपल्स आर्मीने (PLA) आंतरराष्ट्रीय नियमांचे उल्लंघन (International Rules For Border) करून सप्टेंबरमध्ये तैवान सीमेवर (Taiwan Border) 60 वेळा घुसखोरी केली आहे. चीनचे इंटरनेट मीडिया प्लॅटफॉर्म वीबोने नोंदवले आहे की चीनी सैन्याने तैवानच्या एअर डिफेन्स आयडेंटिफिकेशन झोन (एडीआयझेड) मध्ये केवळ घुसखोरीच केली नाही तर युद्धासारखी आक्रमकता देखील दाखवली आहे (China-Taiwan Crisis). या संदर्भात, तैवानने घुसखोरीबद्दल अनेक वेळा इशारे देखील दिले आहेत. अलीकडच्या काळात चीनकडून घुसखोरांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.(China-Taiwan Crisis: Chinese army PLA sends Fighter jets on Taiwan border)
या महिन्यात फक्त 2 आणि 18 सप्टेंबर असे दिवस आहेत, जेव्हा चीनने एकदाही घुसखोरी केली नाही, अन्यथा त्याने दररोज अनेक वेळा घुसखोरी केली आहे. चीन तैवानवर पूर्ण स्वायत्ततेचा दावा करत आहे. 2 कोटी 20 लाख लोकसंख्येच्या या देशाचे वास्तव हे आहे की हा देश सात दशकांपासून पूर्ण स्वायत्ततेने राज्य करत आहे. असे असले तरी, चीन दावा करत असताना सतत दबाव कायम ठेवत आहे. अमेरिका आणि इतर देशांशी संबंध निर्माण करून तैवान सतत चिनी आक्रमणाचा सामना करत आहे.
अलीकडेच चीनच्या आक्रमक भूमिकेमुळे त्रस्त तैवानने युद्ध अभ्यास केला होता . तैवानचे एक F-16 विमान उड्डाणानंतर अननसाच्या शेतात उतरले आणि पुन्हा उड्डाण करण्यापूर्वी इंधन भरले. यामध्ये, तैवान आपल्या स्वदेशी बचावात्मक लढाऊ, अमेरिकन निर्मित F-16, फ्रेंच निर्मित मिराज 2000-5 आणि लवकर चेतावणी देणारी लढाऊ विमाने E-2K सह शेतांमधील महामार्गावर उतरली होती.
तैवानचे परराष्ट्र मंत्री जोसेफ वू म्हणाले की, चीनला तालिबानप्रमाणे त्यांच्या देशावर कब्जा करायचा आहे. चीनचा तैवानवर ताबा मिळवण्याचा बराच काळ प्रयत्न चालू आहे. ऑगस्टमध्ये चीनच्या लष्कराने तैवानजवळ लढाऊ विमाने, पाणबुडीविरोधी विमाने आणि युद्धनौका घेऊन लष्करी सराव केला होता. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने या लष्करी सरावाबाबत म्हटले होते की, चीनच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी असे करणे आवश्यक आहे.जूनमध्ये चीनने तायवानच्या दिशेने विक्रमी 28 लढाऊ विमाने उडवली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.