Bride Dainik Gomantak
ग्लोबल

China Tradition: इथे लग्नाच्या वेळी नवरी मुलीने रडणे आवश्यकच, रडत नसेल तर...

China Strange Tradition: भारतात लग्नानंतर जेव्हा वधूच्या निरोपाची वेळ येते तेव्हा ती सहसा खूप रडते.

दैनिक गोमन्तक

China Tradition: भारतात लग्नानंतर जेव्हा वधूच्या निरोपाची वेळ येते तेव्हा ती सहसा खूप रडते. बहुतेक विवाहसोहळ्यांमध्ये हे दिसून येते. ही परंपरा खूप दिवसांपासून सुरु आहे, पण तुम्हाला माहिती आहे का की अशी परंपरा शेजारील चीनमध्येही आहे. इथेही एक असे ठिकाण आहे, जिथे नववधूला निरोपाच्या वेळी रडावे लागते. कसे रडावे हे कळत नसेल तर तिला मारहाण केली जाते. असे करण्यामागचे कारणही खूप मनोरंजक आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला तर जाणून घेऊया...

17 व्या शतकात ही परंपरा प्रचलित होती

रिपोर्टनुसार, चीनच्या (China) नैऋत्य प्रांतातील सिचुआनमध्ये तुजिया जमातीचे लोक राहतात. हे लोक हजारो वर्षांपासून इथे राहत आहेत. इथे जर मुलीचे (Girl) लग्न झाले असेल तर तिला त्या काळात रडणे आवश्यक आहे. ही परंपरा फार पूर्वीपासून चालत आलेली आहे.

रिपोर्टनुसार, ही परंपरा 17 व्या शतकात सुरु झाली होती. 475 BC ते 221 BC या काळात या पंरपरेची सुरुवात झाली असे म्हणतात. त्यावेळी झाओ राज्याच्या राजकन्येचा विवाह यान राज्यात झाला होता. लग्नानंतर जेव्हा निरोप घेतला जात होता तेव्हा तिच्या आईने रडत रडत मुलीला लवकर घरी परतण्यास सांगितले. तेव्हापासून इथे ही परंपरा सुरु झाली.

वधूला रडण्याची गरज काय आहे?

आता तुमच्या मनात हा प्रश्न नक्कीच येत असेल की, वधूला रडण्याची गरज काय आहे? वास्तविक, निरोप देताना न रडणाऱ्या वधूला या जमातीचे लोक वाईट पिढी मानतात आणि त्या कुटुंबाची गावात थट्टा केली जाते. निरोपाच्या वेळी नववधू रडत नसेल तर तिला मारहाण करुन रडवले जाते.

निरोपाच्या आधीही रडण्याची परंपरा

दक्षिण-पश्चिम प्रांतात, निरोपाच्या वेळी फक्त वधूने रडण्याची प्रथा आहे, तर पश्चिम प्रांतात ही प्रथा वेगळी आहे. इथे जुओ तांग नावाची परंपरा आहे. म्हणजे हॉलमध्ये बसणे. इथे, लग्नाच्या (Marriage) एक महिना आधी, वधूला एका मोठ्या हॉलमध्ये बसून रात्री सुमारे 1 तास रडावे लागते. 10 दिवसांनंतर तिची आई देखील त्यात सामील होते. त्याचबरोबर 10 दिवसांनंतर आजी, बहिणी, काकू आणि इतर महिला त्यात सहभागी होतात. रडत असताना, 'क्रायिंग मॅरेज' नावाचे गाणे वाजवले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT