Fastest Internet Speed Dainik Gomantak
ग्लोबल

Fastest Internet Speed: इंटरनेट क्रांती! चीनने लॉन्च केले हाय-स्पीड 10G क्लाउड ब्रॉडबँड नेटवर्क

China rolls out 10G standard high-speed broadband network: चीन हा देश आपल्या आधुनिक आविष्कांरासाठी ओळखला जातो. अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवण्यात चीन कोणत्याही प्रकारची कसर सोडत नाही. यातच आता, चीनने पुन्हा एकदा मोठा चमत्कार करुन दाखवला आहे.

Manish Jadhav

चीन हा देश जगात आपल्या आधुनिक आविष्कारांसाठी ओळखला जातो. अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवण्यात चीन कोणत्याही प्रकारची कसर सोडत नाही. यातच आता, चीनने पुन्हा एकदा मोठा चमत्कार करुन दाखवला आहे. चीनने हुआवेईने चायना युनिकॉमच्या सहकार्याने हेबेई प्रांतातील झिओंगआन न्यू एरियामध्ये पहिले 10G क्लाउड ब्रॉडबँड नेटवर्क लॉन्च केले. मायड्रायव्हर्सच्या मते, नेटवर्कने 9,800 एमबीपीएस पेक्षा जास्त वेग गाठला, असे न्यूज.एझेडने यूएनएनच्या हवाल्याने वृत्त दिले आहे.

दरम्यान, हा प्रदेश चीनची राजधानी बीजिंगजवळ असून चीनच्या प्रमुख तंत्रज्ञान केंद्रांपैकी एक मानला जातो. हे नेटवर्क जगातील पहिल्या 50G PON सोल्यूशनवर आधारित आहे. "फायबर-ऑप्टिक अॅक्सेस नेटवर्कच्या मूलभूत आर्किटेक्चरच्या अपग्रेडमुळे वापरकर्त्याची बँडविड्थ पारंपारिक गिगाबिट पातळीपासून 10G पातळीपर्यंत वाढते आणि नेटवर्क लेटन्सी मिलिसेकंद पातळीपर्यंत कमी होते," असे सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

प्रकाशित आकडेवारीनुसार, नेटवर्कवरील प्रत्यक्ष डाउनलोड स्पीड 9834 एमबीपीएसपर्यंत पोहोचला. तर अपलोड स्पीड 1008 एमबीपीएस पोहोचला. दरम्यान, हा स्पीड सध्याच्या होम ब्रॉडबँड मानकांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. मायड्रायव्हर्सच्या मते, चीन नेक्स्ट जनरेशन नेटवर्क उपलब्ध करुन देण्यावर आघाडीवर आहे. जानेवारी 2005 पर्यंत, देशात 4.25 दशलक्ष 5जी बेस स्टेशन असून ही जगातील इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा जास्त आहेत. तर दुसरीकडे, चांग गुआंग उपग्रह तंत्रज्ञानाने उपग्रहापासून पृथ्वीवर लेसर कम्युनिकेशनद्वारे 100 गिगाबाइट/सेकंद डेटा ट्रान्समिशन स्पीड गाठला. हा मागील विक्रमाच्या 10 पट असून स्टारलिंकलाही मागे टाकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

Rahul Keni: गोव्याचे राहुल केणी बनले BCCIचे सामनाधिकारी! पंच परीक्षेत मिळवला सहावा क्रमांक

Goa Cyber Crime: रिचार्ज पॅक साठी फोन केला, 44 हजार रुपये केले लंपास; गोकुळवाडी-साखळीतील महिलेला गंडा

SCROLL FOR NEXT