Taliban Dainik Gomantak
ग्लोबल

अफगाणिस्तानच्या उद्ध्वस्त अर्थव्यवस्थेची चीन-पाकिस्तानकडून लूट?

चीन आणि पाकिस्तानला (China and Pakistan) अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेण्याची जरा जास्तच घाई झाली आहे.

दैनिक गोमन्तक

अफगाणिस्तानात (Afghanistan) तालिबानची राजवट पुन्हा स्थापन झाल्याने (Taliban) चीन (China) आणि पाकिस्तानच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. (Pakistan) आणि या दोन देशांच्या नजरा आता देशातील संसाधनांवर खिळू लागल्या आहेत. (Afghan economy). एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, चीन आणि पाकिस्तानला (China and Pakistan) अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेचा फायदा घेण्याची जरा जास्तच घाई झाली आहे. येत्या काळात दोन्ही देशांना याचा मोठा फायदा होणार असल्याची शक्यता जागतिक स्तरावरुन वर्तविण्यात येत आहे. युद्धग्रस्त अफगाणिस्तान सध्या मोठ्या आर्थिक अडचणीतून जात आहे. गरीब देशाला भेडसावणाऱ्या जटिल आर्थिक समस्यांना सामोरे जाण्याचा अनुभव तालिबान्यांना नाही.

अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेचे (Afghanistan’s central bank) माजी प्रमुख देखील देशाच्या अनिश्चित परिस्थितीमध्ये देश सोडून पळून गेले. त्यामुळे, अलीकडेच तालिबानने नवीन प्रमुख नेमला आहे. न्यूज वेबसाईट इनसाइडओव्हरने नोंदवले आहे की, आर्थिक समस्यांना हाताळणारे बहुतेक अफगाण अधिकाऱ्यांनी आता दुहेरी नागरिकत्व प्राप्त केले आहे. अशा परिस्थितीत त्यांना भीती वाटत आहे की, जर काही चूक झाली तर तालिबान त्यांच्या कुटुंबासह त्यांच्यावर सूड उगवू शकतो. या अधिकाऱ्यांनी घेतलेला कोणताही निर्णय, अगदी कल्पना किंवा चर्चाही त्यांच्यासाठी धोकादायक कृती ठरु शकते.

अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेत पाकिस्तानची भूमिका वाढू शकते

इनसाइडओव्हरच्या मते, ते देशातील पाकिस्तानी अधिकाऱ्यांचे वर्चस्व वाढवण्याचे काम करत आहेत. पाकिस्तानी सैन्याने गेल्या महिन्यात तालिबानला अफगाणिस्तानात आपली सत्ता प्राप्त करण्यासाठी मदत केली. अशा स्थितीत त्यांची भूमिकाही वाढू शकते. अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याचे अधिकारी पुढे येत असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या व्यतिरिक्त, त्यांनी अफगाणिस्तानची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी मसुदा देखील तयार केला आहे. इस्लामाबाद आणि बीजिंगने याच परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी योजना आखली आहे. इस्लामाबादने अलीकडेच पहिले पाऊल उचलले, जेव्हा त्याने अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानी रुपयामध्ये व्यापार करण्याची घोषणा केली आहे.

चीननेही तालिबान्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली

पाकिस्तानी अर्थमंत्री शौकत तारिन (Shaukat Tarin) यांनी काबूलमध्ये डॉलरची कमतरता भासत असल्याकारणाने पाकिस्तानी रुपयांमध्ये व्यापार करावा लागत असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर चीननेही तालिबान्यांना वेठीस धरण्यास सुरुवात केली आहे. अलीकडेच, चीनने अफगाणिस्तानच्या अर्थव्यवस्थेला मदत करण्यासाठी 31 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स देऊ केले आहेत. तालिबानने या बदल्यात चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (बीआरआय) सोबत करार करण्यास स्वारस्य दाखवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rahu Gemstone: राहुची महादशा अन् गोमेद रत्नाचा चमत्कार! 'या' 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार; जाणून घ्या फायदे आणि महत्त्वाचे नियम

VIDEO: गोव्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली पर्यटकांची लूट! कळंगुट, बागा किनाऱ्यावर ट्रान्सजेंडरचा वावर, महिलेने उघड केला धक्कादायक प्रकार

Jeffrey Epstein Files: जेफ्री एप्सटीन फाइल्सचा धमाका! डोनाल्ड ट्रम्प, बिल गेट्स यांच्यासह बड्या हस्तींचे फोटो व्हायरल; 18 वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला VIDEO

Curlies Restaurant Sealed : मोठी कारवाई! गोव्यातील वादग्रस्त 'कर्लिस' रेस्टॉरंटला अखेर प्रशासनाने ठोकले टाळे; हडफडे दुर्घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये

T20 World Cup 2026: टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मुहूर्त ठरला! 'या' दिवशी होणार संघाची घोषणा, 'या' 15 खेळाडूंना मिळणार संधी

SCROLL FOR NEXT