Ballistic Missiles Dainik Gomantak
ग्लोबल

'धोकादायक शस्त्रे' बनवण्यासाठी ड्रॅगन करतोय सौदी अरेबियाला मदत

दैनिक गोमन्तक

रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरु आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांची एटॉमिक फोर्स "हाय अलर्ट" वर ठेवली आहे. पुतिन अण्वस्त्र हल्ला करु शकतात, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत जगाच्या एका भागात धोकादायक शस्त्रे बनवण्याची भीती जगाला भेडसावत आहे. ही शस्त्रे युक्रेनमध्ये वापरली जाऊ शकतात, असे बोलले जात आहे. (China is helping Saudi Arabia develop ballistic missiles)

दरम्यान, तज्ज्ञांनी इशारा दिला आहे की, सौदी अरेबिया (Saudi Arabia) आपली आण्विक क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करु शकतो. दुसरीकडे, इराणच्या (Iran) नव्या आण्विक करारावर चिंता व्यक्त केली जात आहे. लिसेस्टर विद्यापीठातील अण्वस्त्र तज्ञ लुडोविका कॅस्टेली म्हणतात की, चीन (China) आधीच सौदी अरेबियाला बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकसित करण्यात मदत करत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅस्टेली म्हणाले की, 2019 मध्ये चीनच्या मदतीने सौदी अरेबियामध्ये एक प्लांट बनवला जात असल्याची बातमी आली होती, परंतु त्यांनी स्पष्ट केले की, 2019 मध्ये पहिल्यांदा या प्लांटची ओळख झाली होती. नोव्हेंबर 2021 मध्ये, सौदी अरेबिया चीनच्या मदतीने बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची निर्मिती करत आहे.

ते पुढे म्हणाले की, सीएनएनचा अहवाल आहे की, यूएस इंटेलला कम्युनिटी प्लांटबद्दल माहिती आहे. मात्र ट्रम्प यांनी यासंबंधीची माहिती काँग्रेसपासून लपवली होती. नव्या सॅटेलाइट इमेजमधून उघड झाले की, सौदी अरेबिया प्लांटवर बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे बनवत आहे. हा प्लांट अजूनही चालू आहे.

युक्रेनचे ग्रोम-2 क्षेपणास्त्र विकसित केले जात आहे

काही मीडिया रिपोर्ट्समधून असेही सांगण्यात आले आहे की, युक्रेनने 300 किमी पल्ल्याच्या ग्रोम-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या निर्मितीसाठी सौदी अरेबियाला मदत केली असावी. तथापि, ही शस्त्रे कशासाठी वापरली जातील याबद्दल फारसे माहिती नाही. पुरावे सूचित करतात की, ते विनाशकारी असू शकतात.

त्याच वेळी, कॅस्टेली म्हणाले की, 'अशा क्षेपणास्त्रांबद्दल ठोस माहिती समोर आली आहे की, या क्षेपणास्त्रांमध्ये 300 किमी पर्यंतच्या लक्ष्यांवर मारा करण्याची क्षमता आहे. जे युक्रेनच्या ग्रोम-2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांसारखे आहे. युक्रेनचे Grom-2 हे क्षेपणास्त्र सध्या विकसित केले जात आहे. हे कमी पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्र मानले जाते, परंतु ते 280 किमी अंतरापर्यंत लक्ष्य करु शकते. काही तज्ञांनी आधीच सुचवले आहे की, युक्रेनसाठी रशियाविरुध्द युद्ध जिंकण्यासाठी अशा प्रकराची क्षेपणास्त्रे जलद गतीने विकसीत केली जात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT