China Interfere Nepal Against India Dainik Gomantak
ग्लोबल

India China Dispute: चिंता वाढली! नेपाळमध्ये भारतीय सीमेपर्यंत फोरलेन हाईवे बांधतोय चीन

China Interfere Nepal Against India: विकासाच्या नावाखाली सुरु झालेली ही पायाभूत सुविधा भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण हा रस्ता बिहारच्या सीमावर्ती भागात पोहोचेल आणि पुढे त्याचा वापर भारताविरुद्ध होऊ शकतो.

Manish Jadhav

India China Tensions: भारताला चारही बाजूंनी घेरण्याचा प्रयत्न चीन सातत्याने करत आहे. यातच आता, भारताचा शेजारी देश नेपाळमध्ये चौपदरी रस्ता बनवण्यास चीनने सुरुवात केली आहे.

विकासाच्या नावाखाली सुरु झालेली ही पायाभूत सुविधा भारतासाठी चिंतेची बाब आहे, कारण हा रस्ता बिहारच्या सीमावर्ती भागात पोहोचेल आणि पुढे त्याचा वापर भारताविरुद्ध होऊ शकतो.

दरम्यान, भारताजवळील (India) सर्व भागात चीनच्या पायाभूत सुविधांच्या कामावर भारतीय एजन्सी लक्ष ठेवून आहेत. देशाच्या सशस्त्र सीमा बल (एसएसबी) ने सीमावर्ती भागात तांत्रिक देखरेख सुधारण्यास सुरुवात केली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, नेपाळची भारतासोबतची खुली सीमा चीनच्या (China) कारवायांचा बळी ठरु शकते. तिथून घुसखोरीचा धोका असू शकतो. खरे तर, नेपाळची सीमा बिहार राज्यापासून जवळपास 700 किलोमीटर अंतरावर आहे.

दुसरीकडे, नेपाळने भारतावर आपली भूमी हडपल्याचा आरोप केला आहे. सुमारे 5 महिन्यांपूर्वी भारत आपल्या भागात (सीतामढी) एक रस्ता बांधत होता, मात्र त्यांचे हे बांधकाम नेपाळी सुरक्षा दलांनी थांबवले होते.

चिनी कारस्थानावर नजर ठेवली जाणार, भारताची तयारी

भारत-नेपाळ खुल्या सीमेवरील संवेदनशील भागांमध्ये लवकरच मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही कॅमेरे आणि दिवे बसवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सशस्त्र सीमा बल (SSB) डेटा बेस सॉफ्टवेअरद्वारे सीमा सुरक्षा अधिक मजबूत करण्याची योजना आखत आहे. ड्रोन तैनात केले जातील. चीनी प्रचाराविरोधात रेडिओद्वारेही मदत घेतली जाऊ शकते.

तसेच, नॅशनल जिओग्राफिक मॅप्सने नेपाळमध्ये चीनकडून सुरु असलेल्या बांधकामांबाबत गेल्या वर्षी अहवाल प्रसिद्ध केला होता.

अहवालात नेपाळच्या मुस्तांग भागाचा उल्लेख केला होता, जिथे चीन रस्ता बांधत होता. चीनच्या अलीकडच्या कृतीमुळे भारताची चिंता वाढली आहे, कारण चीनकडून नेपाळकडे जाणारा रस्ता थेट भारत आणि नेपाळमधील रस्त्यांना जोडत आहे.

ड्रॅगनचा प्रभाव नेपाळी मीडिया आणि रेडिओपर्यंत

नेपाळमध्ये चीनच्या वाढत्या हस्तक्षेपाचा परिणाम म्हणजे नेपाळी प्रसारमाध्यमे आणि रेडिओ भारतविरोधी मोहीम राबवत असल्याचे दिसून आले आहे.

चीनने नेपाळमधील भारतविरोधी मोहिमेला नेपाळी माध्यमे आणि रेडिओद्वारे मोठी रक्कम देऊन शह दिल्याचे बोलले जात आहे.

एसएसबीचे डीआयजी एसके सारंगी यांनी सांगितले की, नेपाळ आणि भारत यांच्यातील रोटी-बेटीचे नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.

भारताच्या बाजूनेही काही एफएम स्टेशन्स उभारली जात आहेत, ज्याद्वारे नेपाळ-भारत मैत्रीला प्रोत्साहन देणारे कार्यक्रम प्रसारित केले जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dance Viral Video: माझ्या डोईवरी भरली घागर रे... कोकणातल्या पोरांचा डान्स पाहून तुम्हीही म्हणाल, 'एक नंबर...'

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

America Firing: गोळीबाराने हादरले 'न्यूयॉर्क'! नाइट क्लबमध्ये बेछूट गोळीबार, 3 ठार, 8 जखमी

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

SCROLL FOR NEXT