Galvan Valley Dainik Gomantak
ग्लोबल

ड्रॅगनची मक्तेदारी, LAC वर 100 पेक्षा जास्त रॉकेट लाँचर केले तैनात

आता मात्र चीनने (China) भारतासोबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान 100 हून अधिक प्रगत रॉकेट लाँचर सीमेवर तैनात केले आहेत.

दैनिक गोमन्तक

गलवान खोऱ्यात (Galvan Valley) भारत (India) आणि चीनच्या (China) सैनिकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (LAC) परिस्थिती अधिक वेगाने बदलत आहे. सीमेवरुन सैनिक हटवण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान लष्करी आणि राजनयिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या पार पडल्या, परंतु असे असूनही दोन्ही देशांचे सैन्य अनेक ठिकाणी सीमेवर समोरासमोर उभे आहेत. आता मात्र चीनने भारतासोबत सुरु असलेल्या चर्चेदरम्यान 100 हून अधिक प्रगत रॉकेट लाँचर सीमेवर तैनात केले आहेत.

यासह, चीनी सैन्याने एलएसी (Indian China LAC Clash) जवळ 155 मिमी कॅलिबर PCL-181 स्व-चालित हॉविट्जर ( Powerful gun) तैनात केले आहेत. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या अहवालात, चिनी लष्कराशी संबंधित एका सूत्राने सांगितले आहे की, चीनने भारताच्या सीमेवर 100 पेक्षा जास्त प्रगत लांब पल्ल्याच्या रॉकेट लाँचर्स तैनात केले आहेत. (Indo-China conflict at LAC). चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने हिमालयात रक्तरंजित हिवाळ्याची तयारी करत असल्याचे सूत्राने सांगण्यात येत आहे.

लद्दाखजवळ 10 युनिट तैनात

ही तैनाती M777 अल्ट्रा-लाइट हॉविट्झर्ससह भारतीय लष्कराच्या तीन रेजिमेंटच्या तैनातीला प्रतिसाद म्हणून आहे. भारत-चीन सीमेवर दोन्ही देश नवीन शस्त्रे तैनात करत आहेत. चीनने LAC वर PHL-03 लाँग-रेंज मल्टीपल रॉकेट लाँचर तैनात केले आहे. चीनी मीडिया सीसीटीव्हीच्या अहवालानुसार, नवीन PHL-03 मल्टीपल रॉकेट लाँचरच्या 10 युनिट्स लद्दाखजवळ तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक युनिटमध्ये चार क्रू मेंबर असतात ( Indo-China conflict at LAC). प्रत्येकामध्ये 300 मिमीच्या 12 लाँचर ट्यूब आहेत.

हल्ला किती दूर जाऊ शकतो?

त्याचे रॉकेट 650 किमी अंतरावर धडक देऊ शकतात. 12 मीटर लांब रॉकेट ताशी 60 किलोमीटर वेगाने उडतात. याशिवाय चीनने भारतीय सीमेजवळ टाइप PCL-191 रॉकेट लाँचर देखील तैनात केले आहे. ते चीनच्या AR3 प्रणालीच्या आधारे विकसित केले गेले आहेत. चीनच्या प्रकार PCL-191 मल्टीपल लॉन्च रॉकेट सिस्टीम (MLRS) देखील 1 ऑक्टोबर रोजी चीनच्या राष्ट्रीय दिनाच्या परेडमध्ये प्रदर्शित करण्यात आली. त्याची श्रेणी 350 किमी असल्याचे सांगितले जाते. ही मॉड्यूलर रॉकेट सिस्टीम 370 मिमी रॉकेट फायर करु शकते. या अहवालात असे म्हटले आहे की, चीनी लष्कराने 100 पेक्षा जास्त PCL-181 ट्रक माउंटेड हॉविट्जर देखील तैनात केले आहेत.

PCL-181 M777 पेक्षा किती घातक आहे?

चीनचा दावा आहे की, PCL-181 होवित्झरची फायरिंग रेंज M777 च्या दुप्पट आहे. 155 मिमी कॅलिबर PCL-181 स्व-चलित होवित्झर लद्दाखच्या परिसरात तैनात करण्यात आले आहेत. (LAC India China Border News) काही दिवसांपूर्वी लद्दाखजवळ या होवित्झरची प्रगत आवृत्ती तैनात करण्यात आल्याचा चीनी माध्यमांचा दावा आहे. हे होवित्झर 122 मिमी कॅलिबरचे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"आम्ही आणि पाकिस्तानी सैन्य एकच!" लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी सैफुल्लाह कसूरीची मोठी कबुली; भारताविरुद्ध पुन्हा ओकली गरळ

"...म्हणून गोवा बर्बाद" राज ठाकरेंनी मांडलं जमिनींच्या लुटीचं 'डिजिटल' गणित; महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत रील्सस्टार्सना लगावला टोला

Goa Tourism: गोव्याचा पर्यटनात जागतिक डंका! 2025 मध्ये 1 कोटी 8 लाख पर्यटकांनी दिली भेट

IND vs NZ: ऋषभ पंतच्या जागी 'या' युवा खेळाडूची संघात एन्ट्री, 'BCCI'ने केली घोषणा

Goa Politics: गोव्यात 'आप'ची नवी टीम जाहीर! वाल्मिकी नाईक प्रदेशाध्यक्ष, तर गर्सन गोम्स कार्यकारी अध्यक्ष

SCROLL FOR NEXT