College Students Dainik Gomantak
ग्लोबल

China: जन्मदर वाढवण्यासाठी चीनने लढवली अनोखी शक्कल, रोमान्सला...

चीन सध्या आपल्या घटत्या जन्मदरामुळे चिंतेत आहे. त्यामुळेच घटत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी रोज नवनवे डावपेच अवलंबले जात आहेत.

Manish Jadhav

China: चीन सध्या आपल्या घटत्या जन्मदरामुळे चिंतेत आहे. त्यामुळेच घटत्या लोकसंख्येला तोंड देण्यासाठी रोज नवनवे डावपेच अवलंबले जात आहेत.

त्याचबरोबर सरकारच्या राजकीय सल्लागारांनीही जन्मदर वाढवण्यासाठी अनेक शिफारशी केल्या आहेत, कारण ही चिंता पूर्वीपेक्षा अधिक वाढली आहे.

दुसरीकडे, जन्मदर वाढवण्यासाठी चीनमध्ये आधीपासूनच अनेक योजना राबवल्या जात असल्या तरी, यावेळी अनेक महाविद्यालये देखील या राष्ट्रीय चिंतेला समर्थन देण्यासाठी एक अनोखी योजना आणत आहेत.

खरे तर, चीनमधील (China) काही महाविद्यालयांमध्ये प्रेमासाठी एका आठवड्याची विशेष सुट्टी देण्यात आली आहे.

NBC न्यूजमधील एका अहवालानुसार, फॅन मेई एज्युकेशन ग्रुपद्वारे चालवल्या जाणाऱ्या नऊ महाविद्यालयांपैकी एक असलेल्या मियायांग फ्लाइंग व्होकेशनल कॉलेजने 21 मार्च रोजी पहिल्यांदा स्प्रिंग ब्रेकची घोषणा केली, रोमान्सवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्याचप्रमाणे उर्वरित महाविद्यालयांनाही 1 एप्रिल ते 7 एप्रिलदरम्यान सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

त्याचबरोबर, या सुट्ट्यांमध्ये महाविद्यालयांनी (College) विद्यार्थ्यांना गृहपाठही दिला आहे. यासोबतच सुट्टीच्या काळात विद्यार्थ्यांनी आपले अनुभव डायरीत लिहावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

तसेच, जन्मदर वाढवण्यासाठी चीन सरकारने 20 हून अधिक योजना आणल्या आहेत. 1980 ते 2015 दरम्यान लागू करण्यात आलेल्या वन चाइल्ड पॉलिसीसह चीनने मोठ्या प्रमाणात लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष केंद्रित केले.

त्याचवेळी, घटत्या लोकसंख्येमुळे बॅकफूटवर आलेल्या सरकारच्या सूचनेवरुन अधिकाऱ्यांनी 2021 मध्ये जास्तीत जास्त तीन मुलांची संख्या वाढवली, मात्र दरम्यानच्या काळात लोकसंख्येच्या अनेक कारणांमुळे मुले जन्माला घालण्यास टाळाटाळ होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

Arjun Tendulkar: नको तेच झालं! साखरपुड्यानंतर सचिनच्या लेकाला मोठा धक्का, नेमकं प्रकरण काय? वाचा..

SCROLL FOR NEXT