China Electricity crisis Affect on several company Dainik Gomantak
ग्लोबल

चीनमध्ये विजेचं संकट,ॲपल आणि टेस्ला कंपनीलाही फटका

आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या मते, वीज संकटामुळे (China Electricity crisis) कार कंपनी टेस्ला आणि तंत्रज्ञान कंपनी ॲपलच्या अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे.

दैनिक गोमन्तक

चीनमधील (China) विजेचे संकट अधिकच वाढत जात आहे. अशा परिस्थितीत अनेक राज्यांमध्ये लोकांना केवळ अंधारातच रात्र काढावी लागत नाही (China Electricity Crisis), तर टंचाई इतकी वाढली आहे की आर्थिक घडामोडी थांबल्यामुळे अर्थव्यवस्थेला (China Economy) मोठा फटका बसण्याची अपेक्षा आहे.या वीज खंडतेचा परिणाम इतर देशांवरही होऊ शकतो कारण ख्रिसमसच्या आधी, जगभरातील खरेदीदारांना स्मार्टफोनच्या संभाव्य कमतरतेचा सामना करावा लागत आहे. चीन सरकारने (China Government) वीज वापरावर वरची मर्यादा निश्चित केली आहे, ज्यामुळे कंपन्यांना त्यांचे उत्पादन प्रकल्प बंद करण्यास भाग पडत आहे आणि असे नुकसान चीन मध्ये लोक भोगत आहेत. (Big Electricity crisis in China Affect on several company)

उत्तर चीनच्या अनेक प्रांतांमध्ये विजेची तीव्र टंचाई आहे. ट्रॅफिक लाईट बंद केल्यामुळे रस्त्यांवर गोंधळाचे वातावरण आहे. ग्वांडोंग हे एक औद्योगिक केंद्र आहे. येथे लोकांना घरांमध्ये नैसर्गिक प्रकाशाचा वापर आणि एसीचा वापर कमी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. येथील कारखान्यांमध्ये आधीच वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

आयएएनएस या वृत्तसंस्थेच्या मते, वीज संकटामुळे कार कंपनी टेस्ला आणि तंत्रज्ञान कंपनी ॲपलच्या अनेक कंपन्यांनी उत्पादन बंद करण्याची घोषणा केली आहे. तथापि, ॲपलच्या कंपनी युनिमिक्रॉनने म्हटले आहे की ते मागणी पूर्ण करण्यासाठी इतर ठिकाणी उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करेल. अन्य एका कारखानदाराने सांगितले की, रविवारी दुपारी उत्पादन बंद करण्यास सांगितले होते. पण गुरुवारपर्यंत उत्पादन सुरू करता येईल का , याबद्दल अजूनही शंका आहे.

घरगुती ग्राहकांना भेडसावणाऱ्या समस्या हे देखील दर्शवतात की चीनमध्ये वीज संकट किती वेगाने वाढत आहे, कारण येथे सामान्यत: जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा पहिल्या मोठ्या औद्योगिक ग्राहकांना वापर कमी करण्यास सांगितले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT