कोविड-19 विषाणूच्या (Corona) कितीतरी आधी जगभरात परसलेला 'H3N8 बर्ड फ्लू' हा विषाणू प्रथमच मानवी शरीरात आढळून आला आहे. चीनच्या हेनान प्रांतातील एका व्यक्तीमध्ये 'बर्ड फ्लू' चा H3N8 हा विषाणू आढळला आहे. चीनच्या राष्ट्रीय आरोग्य (NHC) कडून याबाबत एक निवेदन जाहीर करण्यात आले आहे. या निवेदनात अशा प्रकारचा विषाणू आढळला आहे. मात्र त्याचा धोका हा कमी असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही. या संसर्गाला (Virous) चार वर्षाचा मुलगाही बळी पडला आहे.
एनएचसीने दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूमुळे रुग्णामध्ये ताप आणि इतरही अनेक लक्षणे पाहायला मिळतात. ज्या मुलाला या H3N8 विषाणुची लागन झाली होती, त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांची चाचणी केल्यास त्या लोकांमध्ये हा विषाणू आढळला नाही. याचाच अर्थ असा की, हा विषाणू संसर्गजन्य नाही. एनएचसीने माहिती देताना सांगितले की, हा मुलगा घरी पाळलेल्या एका कोंबडी आणि कावळ्याच्या संपर्कात आला होता. त्याच्यात ताप आणि इतर काही लक्षणे आढळून आली होती.
चीनच्या (China) आरोग्य विभागाने म्हटले की H3N8 संक्रमणापूर्वी जगभरात घोडे, कुत्रा आणि इतर पक्षांमध्ये आढळून आला होता. दरम्यान, H3N8 चे कोणतेही मानवी प्रकरण पुढे आले नाही. परंतु, सध्या आढळून आलेला हा जगभरातील पहिलाच रुग्ण आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.