China Defence Minister General Li Shangfu & Rajnath Singh  Dainik Gomantak
ग्लोबल

India China Conflict: गलवान चकमकीनंतर भारत-चीनचे संरक्षण मंत्री पहिल्यांदाच भेटणार, या दिवशी होणार भेट!

India China Conflict: चीनचे संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू गुरुवारी त्यांचे भारतीय समकक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत.

Manish Jadhav

India-China Conflict: चीनचे संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू गुरुवारी त्यांचे भारतीय समकक्ष राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहेत. मे 2020 मध्ये पूर्व लडाखमधील गलवान व्हॅलीमध्ये सैन्यांत झालेल्या हिंसक चकमकीनंतर ही पहिलीच बैठक असेल.

खरे तर, शांगफू 27 एप्रिलपासून शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन (SCO) संरक्षण मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी या आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहेत.

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे निकटवर्तीय मानले जाणारे जनरल ली यांचा भारत (India) दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.

जनरल ली आणि संरक्षण मंत्री सिंग यांच्यात द्विपक्षीय बैठकीदरम्यान सीमेवरील गतिरोध दूर करण्यासाठी चर्चा होऊ शकते. यासोबतच दोघांमध्ये लष्करी आणि राजनैतिक चर्चेच्या प्रगतीवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.

चीनच्या संरक्षण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, "आमंत्रणानुसार, संरक्षण मंत्री जनरल ली शांगफू नवी दिल्ली येथे 27 ते 28 एप्रिल दरम्यान SCO सदस्य देशांच्या संरक्षण मंत्र्यांच्या परिषदेला उपस्थित राहतील."

ली यांच्या भेटीपूर्वी, चीनच्या (China) संरक्षण मंत्रालयाने 23 एप्रिल रोजी चुशुल-मोल्डो सीमा साइटवर आयोजित चीन-भारत कॉर्प्स कमांडर-स्तरीय बैठकीच्या 18 व्या फेरीबद्दल सकारात्मकता दर्शवली.

सीमावर्ती भागात शांतता राखण्याबरोबरच पूर्व लडाखमधील दीर्घकाळापासून सुरु असलेल्या अडथळ्याचे निराकरण करण्यासाठी दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवल्याचे चीनने म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे की, दोन्ही बाजूंनी संबंधित मुद्द्यांवर मैत्रीपूर्ण आणि स्पष्ट विचारांची देवाणघेवाण झाली.

लष्करी पातळीवरील चर्चेतून काय निष्पन्न झाले

पीपल्स लिबरेशन आर्मी (पीएलए) च्या निवेदनात म्हटले आहे की, संबंधित मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मैत्रीपूर्ण आणि स्पष्ट चर्चा झाली.

दोन्ही देशांच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांमधील बैठकीतील यशाच्या आधारे, संवाद कायम ठेवण्यावर, चीन-भारत सीमेच्या पश्चिमेकडील क्षेत्रातील संबंधित समस्यांच्या निराकरणास गती देण्यावर आणि शांतता राखण्याचे मान्य केले.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते माओ निंग यांनी सांगितले की, ''दोन्ही बाजूंनी संबंधित समस्यांचे त्वरित निराकरण करण्यावर सखोल चर्चा केली.

"दोन्ही देशांच्या नेत्यांच्या समान समजुतीनुसार, दोन्ही बाजूंनी संबंधित समस्यांचे निराकरण जलद करण्यावर सखोल चर्चा केली." मात्र, याबाबत सविस्तर माहिती संबंधित अधिकारीच देऊ शकतात.

एस जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली

2 मार्च रोजी, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नवी दिल्ली येथे G-20 शिखर परिषदेत छिन कांग यांच्याशी चर्चा केली.

चर्चेत जयशंकर यांनी कांग यांना सांगितले की, भारत-चीन संबंधांची स्थिती असामान्य आहे. बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांसमोरील आव्हाने, विशेषत: सीमावर्ती भागातील शांतता आणि स्थैर्याशी संबंधित आव्हानांवर चर्चा केली.

पूर्व लडाखमध्ये 34 महिन्यांहून अधिक काळ सुरु असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक झाली. जयशंकर म्हणाले की, 'परराष्ट्र मंत्री झाल्यानंतर ही आमची पहिली भेट आहे. आम्ही एकमेकांशी सुमारे 45 मिनिटे चर्चा केली.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT