Ultra-fast space plane Dainik Gomantak
ग्लोबल

चीन बनवतोय 'अल्ट्रा-फास्ट' स्पेस प्लेन!

चीनची एक कंपनी 'अल्ट्रा-फास्ट' स्पेस प्लेन (Ultra-fast space plane) तयार करत आहे. हे विमान प्रवाशांना पृथ्वीच्या कोणत्याही भागात नेण्यास सक्षम असणार आहे.

दैनिक गोमन्तक

चीन जगभरात वेगाने आपली ताकद वाढवत आहे. जगातील अविकसीत असणाऱ्या देशांना कर्ज देऊन चीन त्यांना आपला मांडलिक बनवत आहेत. याच पाश्वभूमीवर दुसरीकडे समुद्रशक्तीमध्ये प्रगती करत असताना अंतराळामध्येही वेगवेगळी संशोधने चीन (China) करत आहे. यातच आता चीनची एक कंपनी 'अल्ट्रा-फास्ट' स्पेस प्लेन तयार करत आहे. हे विमान प्रवाशांना पृथ्वीच्या कोणत्याही भागात नेण्यास सक्षम असणार आहे. यासाठी पहिल्यांदा स्पेस प्लेन अंतराळात जाईल आणि त्यानंतर तिथून ते पृथ्वीच्या दिशेकडे झेपावेल. या कामासाठी वापरल्या जाणार्‍या रॉकेटचे नाव Tianxing 1 (Tianxing I) आहे. रॉकेटला छोटे विमान जोडण्यात येणार आहे. एकदा का ते पुरेशा उंचीवर पोहोचल्यानंतर, विमान रॉकेटपासून स्वतःला वेगळे होईल आणि नंतर ताशी 2600 मैलांच्या वेगाने अंतराळात त्याच्या गंतव्यस्थानाकडे झेपावेल. (China builds an ultra fast space plane)

दरम्यान, बीजिंग स्थित स्पेस ट्रान्सपोर्टेशन 2018 पासून हे यान तयार करत आहे. कंपनीने याला पंख असलेले रॉकेट म्हटले असून हे विमान 2025 पर्यंत लॉन्च करण्याची योजना आहे. रॉकेटचे प्रक्षेपण चाचणी उड्डाणात यशस्वी झाले असून ते जमिनीवर यशस्वीपणे उतरले आहे. मात्र, संपूर्ण स्पेस प्लेनची टेस्ट अजून बाकी आहे. जर स्पेस प्लेनने 2,671 मैल प्रतितास इतका वेग गाठला, तर हे सुपरसॉनिक विमान कॉनकॉर्डच्या दुप्पट वेगाने प्रवास करेल. या वेगाने लंडन ते न्यूयॉर्क हा प्रवास तासाभरात करता येतो.

स्पेस प्लेन बनवणाऱ्या कंपनीने काय म्हटले?

चिनी कंपनीची ही योजना काही सुरक्षा विश्लेषकांना चिंता करु शकते. वास्तविक, चीन सरकारच्या (Chinese Government) हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या चाचणीमुळे अमेरिकन अधिकाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. त्याच वेळी, कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, 'आम्ही जे विकसित करत आहोत ते पंख असलेले रॉकेट आहे. जे हाय-स्पीड पॉइंट-टू-पॉइंट वाहतुकीस मदत करेल.’ किंमतीचे तपशील अद्याप जाहीर केलेले नाहीत. मात्र, हे रॉकेट प्रक्षेपणापेक्षा स्वस्त असेल आणि पारंपारिक विमानांपेक्षा खूप वेगवान असेल, अशी अपेक्षा आहे. कंपनीने स्पेस प्लेनशी संबंधित एक व्हिडिओही जारी केला आहे.

चीन सरकारही स्पेस प्लेन बनवतोय

गेल्या वर्षी, स्पेस ट्रान्सपोर्टेशनने हायपरसोनिक स्पेस प्लेन विकसित करण्यासाठी $46.3 दशलक्ष जमा केले. कंपनीने रॉकेट लाँचरची सुमारे 10 चाचणी उड्डाणे केली आहेत. चीन सरकार चायना एरोस्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून स्पेस प्लेनवर काम करत असल्याचीही अफवा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT